हर्षा भोगले कॉलम

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:38+5:302015-02-11T23:19:38+5:30

लंकेच्या फलंदाजांना मोठा अनुभव!

Harsha Bhogale column | हर्षा भोगले कॉलम

हर्षा भोगले कॉलम

केच्या फलंदाजांना मोठा अनुभव!
हर्षा भोगले लिहितो...
मोठ्या स्पर्धेत फायनल गाठण्याची सवय लागलेला श्रीलंका संघ आता पटाईत झाला आहे; तरीही अनेक जण या संघाविषयी चर्चा करीत नाही. लंकेचा पाठीराखा असतो तर असे ऐकून नाराज झालो असतो. कागदावर तरी हा संघ बलाढ्य आणि संतुलित दिसत आहे,
अलीकडे मी ज्यांच्यासोबत चर्चा केली त्या सर्वांनी विश्वचषकात अनुभवाची गरज असते असेच सांगितले. लंका संघातील सुरुवातीच्या चारपैकी तीन फलंदाजांकडे विश्वचषकात खेळल्याचा मोठा अनुभव आहे. यापैकी दोन तर जबर फॉर्ममध्ये आहेत. संगकारा लंका क्रिकेट बोर्डावर नाराज असला तरी फलंदाजीत त्याने सर्वस्व पणाला लावल्याचे आपण पाहत आहोत. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याने लंकेला विश्वचषकाची पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठायची झाल्यास त्यात संगकाराची भूमिका मोलाची ठरेल.
दिलशान २०१५ च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकेल का, असा प्रश्न काही वर्षांआधी पडला असावा.पण तो खेळतच आहे आणि संघासाठी अलीकडे त्यानेही उत्तम खेळी केली. तो फिट असून सलग धावा काढत आहे. माहेला जयवर्धनेबाबत बोलायचे झाल्यास तो फॉर्ममध्ये नसेलही, पण कधीही त्याला सूर गवसू शकतो. लंका क्रिकेटमधील ही त्रिमूर्ती आपल्या विशेष अंदाजात क्रिकेटला अलविदा करेल, यात शंका नाही.
या संघात मोठ्या अनुभवाशिवाय युवा जोश आहे. संगकाराशिवाय अँजेलो मॅथ्यूज हा लंका क्रिकेटसाठी महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. मॅथ्यूज हा भेदक मारा करतो, शिवाय अव्वल सहा फलंदाजांमध्ये धावांचेही योगदान देऊ शकतो. आशियाई देशांसाठी लंका संघासाठी हा विशेष लाभ ठरावा. मॅथ्यूज- तिसारा परेरा यांच्यामुळे संघात संतुलन निर्माण होते. या संघाकडे उत्कृष्ट यष्टिरक्षक आणि आघाडीच्या सहा गोलंदाजांचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे परेरा सातव्या स्थानावर चांगला पर्याय आहे. तरीही सत्य हेच की, लंकेकडे तळाच्या फळीत चांगली फलंदाजी नाहीच. कुलसेकरा याला आपण जितके पाहतो त्यापेक्षा तो चांगला खेळाडू आहे. अशावेळी गोलंदाजीत चांगली कामगिरी करण्याचे आव्हान लंकेकडे असेल. नुकत्याच झालेल्या मालिकेत न्यूझिलंडविरुद्ध लंकेच्या फिरकीपटूंनी तब्बल ३५ षटके टाकली होती. वेगवान आणि फिरकी माऱ्याचा हा योग्य समन्वय नव्हता.
लसिथ मलिंगा याने परफेक्ट यॉर्कर न टाकल्यास त्याचीही धुलाई होऊ शकते. आधुनिक क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडून बारीक चूक झाली तरी त्यावर चार धावा गेल्याचे उदाहरण घडत आहे. मलिंगाकडून स्पर्धेच्या उत्तरार्धात अधिक चांगली कामगिरी होण्याची शक्यता आहे. विश्वचषकाआधी त्याने अलीकडे खूप जास्त गोलंदाजी केलेली नाही. हेरथ,सेनानायके आणि सुरंगा लकमल यांच्या रूपाने लंकेकडे भारतीय उपखंडात उत्तम मारा करणारे गोलंदाज आहेत. माझ्यामते लंका संघ दावेदार म्हणून स्वत:ला सादर करेल. त्यासाठी संगकारा आणि मॅथ्यूज यांना मोलाची भूमिका वठवावी लागेल.(टीसीएम)

Web Title: Harsha Bhogale column

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.