कट्टरपंथियांना शामीचं चोख उत्तर, पत्नीसोबतचा अजून एक फोटो केला शेअर

By admin | Published: January 2, 2017 09:04 AM2017-01-02T09:04:03+5:302017-01-02T09:04:03+5:30

भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आपण कट्टरपंथियांना घाबरत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

Hardline voters reply, they shared yet another photo | कट्टरपंथियांना शामीचं चोख उत्तर, पत्नीसोबतचा अजून एक फोटो केला शेअर

कट्टरपंथियांना शामीचं चोख उत्तर, पत्नीसोबतचा अजून एक फोटो केला शेअर

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने आपण कट्टरपंथियांना घाबरत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. पत्नी हसीनसोबत फोटो शेअर केल्यानंटर टीकेला सामोरं जाव लागलेल्या शामीने शनिवारी रात्री पत्नीसोबत अजून एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन कट्टरपंथियांनी शामीला लक्ष्य करत पत्नीला झाकून ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र शामीने अजून एक फोटो शेअर करत आपल्याला अशा टिकेचा काही फरत पडत नसल्याचं दाखवून दिलं आहे. 
 
(पत्नीच्या 'त्या' फोटोवरुन शामीचे टीकाकारांना चोख उत्तर)
 
मोहम्मद शामीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत फोटो शेअर केला आहे. या फोटोसाठी त्याने कवितेच्या ओळी टाकत शुभेच्छा दिल्या आहेत. ,'ना साथी है ना हमारा है कोई ना किसी के हम। पर आपको देख कर कह सकते हैं एक प्यारा सा हमसफर है कोई' अशा काव्यात्मक शुभेच्छांहित शामीने पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हजारो लोकांनी शामीच्या फोटोला लाईक आणि रिट्विट केलं आहे. 
 
काही दिवसांपुर्वी शामीने फेसबूक आणि ट्टिवरवर आपली पत्नी आणि मुलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. ज्यावरुन शामीला धर्म आणि संस्कृतीच्या रक्षकांकडून टीकेचा सामना करावा लागला होता. शामीच्या पत्नीने घातलेल्या कपड्यांवरुन टीका करत पुढच्या वेळी हिजाब परिधान करुन फोटो काढण्याचा सल्ला देण्यात आला होता. काही लोक तर शामीला आपल्या पत्नीला ताब्यात ठेवायला जमत नसल्याचंही बोलले होते. तर काहींनी शामीच्या मुसलमान होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
 
मात्र शामीने या सर्वांनी चोख उत्तर देत तोंड बंद केलं होतं. 'माझी पत्नी आणि मुलगी माझे आयुष्य आहेत. काय करावे किंवा काय करु नये हे मला चांगले ठाऊक आहे. आपल्याला स्वत:मध्ये डोकावून आपण किती चांगले आहोत हे पाहिले पाहिजे,' असे टि्वट करत शामीने टीकाकारांना चांगलंच सुनावलं होतं. सोशल मीडियावर जसे विरोधक उभे राहिले तसेच समर्थकही समोर आले. क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही शामीचे समर्थन केले होते. शामीच्या वडिलांनीही सुनेचं समर्थन केलं होतं. 'इस्लाम काय सांगतं आम्हाला चांगलंच माहित आहे. कोणाच्याही निरर्थक सल्ल्याची आम्हाला गरज नाही', असं ते बोलले होते.