हरभजनच्या विवाहात हाणामारी; ४ बाऊन्सरना अटक
By Admin | Updated: October 30, 2015 22:25 IST2015-10-30T22:25:10+5:302015-10-30T22:25:10+5:30
क्रिकेटपटू हरभजनसिंग आणि सिनेस्टार गीता बसरा यांच्या विवाह सोहळ्याच्या वार्तांकनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हाणामारी केल्याच्या प्रकरणात

हरभजनच्या विवाहात हाणामारी; ४ बाऊन्सरना अटक
जालंधर : क्रिकेटपटू हरभजनसिंग आणि सिनेस्टार गीता बसरा यांच्या विवाह सोहळ्याच्या वार्तांकनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना हाणामारी केल्याच्या प्रकरणात पंजाब पोलिसांनी चार बाऊ न्सर्संना अटक केली आहे.
अधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, बाऊ न्सर्सच्या वर्तनामुळे नाराज झालेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चार बाऊन्सर्सविरुद्ध तक्रार केली होती. हाणामारीची घटना गुरुवारी सायंकाळची आहे. चंदीगडपासून १५० किलोमीटर लांब असलेल्या जालंधर शहरात विवाह समारंभादरम्यान चार बाऊन्सर्सनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कथितप्रकरणी मारहाण केली. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार केली आहे की, विवाह समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी येथे उपस्थित असताना बाऊ न्सर्सनी मारहाण केली व साहित्याची (कॅमेरा) मोडतोड केली.
पंजाब पोलीसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार केल्यानंतर आम्ही गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.’
एक अधिकारी म्हणाला, ‘आम्ही कुलदीप, गुरप्रीत, नवज्योत आणि बवन यांच्यासह ४ बाऊ न्सर्सला अटक केली आहे.’ अटक करण्यात आलेल्या एका बाऊन्सरने दावा केला आहे की, ‘हरभजनसिंगने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आतमध्ये प्रवेश करू न देण्याचे निर्देश दिले होते.’(वृत्तसंस्था)