हरभजनसिंग, आर. अश्विन फेकी बॉलर - सईद अजमलचा आरोप
By Admin | Updated: November 3, 2015 15:09 IST2015-11-03T13:48:17+5:302015-11-03T15:09:02+5:30
अवैध गोलंदाजी शैली प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर सईद अजमलने हरभजन सिंग व आर. अश्विन हे फेकी बॉलर असल्याचा आरोप केला आहे.

हरभजनसिंग, आर. अश्विन फेकी बॉलर - सईद अजमलचा आरोप
>ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ३ - अवैध गोलंदाजी शैली प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आलेला पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर सईद अजमलने हरभजन सिंग व आर. अश्विन या भारतीय गोलंदाजांच्या शैलीवर आक्षेप घेत ते चेंडू फेकत असल्याचा आरोप केला आहे.
पाकिस्तानचा फिरकीपटू असलेल्या सईद अजमलची गोलंदाजीची शैली अवैध ठरवत आयसीसीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याच्यावर बंदी घातली होती, ती अजून कायम आहे. त्यामुळे अद्यापही संघाच्या बाहेरच आहे. पाकिस्तानमधील पत्रकार झैनाब अब्बास हिला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सईदने हरभजन आणि अश्विनच्या गोलंदाजीवर आक्षेप घेत त्यांना लक्ष्य केलं आहे. हरभजनची गोलंदाजी सदोष आहे, त्याचा प्रत्येक चेंडू चुकीच्या पद्धतीने फेकलेला असतो. त्याचा डावा खांदा १५ डीग्रीपेक्षा अधिक खाली झुकतो, आर. अश्विनची गोलंदाजीही काहीशी अशीच आहे. त्या दोघांचीही गोलंदाजी अवैध असून मी दोघांनाही खुलं आव्हान देतो, असे सईद अजमलने म्हटले आहे.