हरभजन आणि रायुडू मैदानात भिडले

By Admin | Updated: May 2, 2016 11:24 IST2016-05-02T09:51:18+5:302016-05-02T11:24:44+5:30

मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचे खेळाडू हरभजन सिंग आणि अंबाती रायुडू आपापसांत भिडले

Harbhajan and Rayudu got into the field | हरभजन आणि रायुडू मैदानात भिडले

हरभजन आणि रायुडू मैदानात भिडले

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 02 - क्रिकेटच्या मैदानात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू एकमेकांना भिडणं तसं नवं नाही. पण एकाच संघातील दोन खेळाडू एकमेकांविरोधात भिडताना फार कमी वेळा पाहायला मिळतं. मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचे खेळाडू हरभजन सिंग आणि अंबाती रायुडू आपापसांत भिडले. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर हा सामना पार पडला
 
पुणे संघाची फलंदाजी चालू असताना अकराव्या ओव्हरमध्ये हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर पुण्याच्या सौरभ तिवारीने लॉग ऑनला शॉट लगावला. मात्र अंबाती रायुडू चौकार अडवू शकला नाही यामुळे हरभजन सिंग वैतागला. आणि त्याने राग व्यक्त करत रायुडूला अपशब्द वापरले . हरभजन सिंगने व्यक्त केलेला राग पाहून अंबाती रायुडूचा रागदेखील अनावर झाला आणि हरभजन सिंगच्या दिशेने चालत गेला. यावेळी मैदानातील सर्वांनाच आता शाब्दिक चकमक वाढेल असं वाटलं होतं. मात्र हरभजनने रायुडूची समजूत काढत त्याला परत पाठवून दिले. 
हरभजन सिंगसाठी मैदानावरील वाद तसा काही नवा नाही. यआगोदरही आयपीलमध्ये हरभजनचे पंजाब संघाकडून खेळणाऱ्या एस. श्रीशांतच्या श्रीमुखात लगावली होती. ज्यानंतर खुप मोठा वाद झाला होता. हरभजन आणि अंबाती रायुडू यांच्यातील शाब्दिक चकमक जास्त वाढली नसली तरी अशाप्रकारे मैदानात गैरवर्तन केल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे.
 
मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा आठ विकेट्सने पराभव केला. 
 

Web Title: Harbhajan and Rayudu got into the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.