Happy Diwali - भारताचा द. अफ्रिकेवर १०८ धावांनी विजय

By Admin | Updated: November 7, 2015 15:48 IST2015-11-07T11:30:39+5:302015-11-07T15:48:46+5:30

जिंकण्यासाठी भारताने अफ्रिकेसमोर २१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय फिरकीपटूंनी अफ्रिकेच्या फलंदाजीची दाणादाण उडवताना अवघ्या ७३ धावांमध्ये ६ गडी टिपले आहेत

Happy Diwali - India's D Afridi hit by 108 runs | Happy Diwali - भारताचा द. अफ्रिकेवर १०८ धावांनी विजय

Happy Diwali - भारताचा द. अफ्रिकेवर १०८ धावांनी विजय

>
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ७ - पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी करणा-या भारताने तिस-या दिवशीच १०८ धावांनी हा सामना जिंकला आणि कसोटी मालिकेची सुरुवात जोशात केली आहे. जिंकण्यासाठी भारताने अफ्रिकेसमोर २१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु भारतीय फिरकीपटूंनी अफ्रिकेच्या फलंदाजीची दाणादाण उडवताना अवघ्या १०९ धावांमध्ये अफ्रिकेचा डाव गुंडाळला. रवींद्र जाडेजाने २१ धावांमध्ये ५ गडी टिपले तर अश्विनने ३९ धावांमध्ये ३ गडी टिपले आणि भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
भारताच्या २१८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचे एल्गर (१६), फिलॅंडर (१), ड्यू प्लेसिस (१), अमला (०) आणि एबी डिव्हिलीअर्स (१६) आघाडीचे फलंदाज अवघ्या ५० धावांत बाद झाले आहेत. पाठोपाठ डि. जे. व्हिलालाही जाडेजाने तंबूत धाडलेत्यानंतर अफ्रिकेच्या तळाच्या फलंदाजांनाही भारतीय फिरकीपटूंनी झटपट बाद केले.  भारतातर्फे जाडेजाने ५, अश्विनने ३ तर मिश्रा व अॅरॉन यांनी प्रत्येकी १ बळी मिळवत आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडले. 
तत्पूर्वी  दुसरा डाव अवघ्या २०० धावांमध्ये संपुष्टात आल्याने भारताने आफ्रिकेसमोर विजयासाठी २१८ धावांचे आव्हान ठेवले. 
तिस-या दिवसाचा खेळ सुरू करताना भारताची स्थिती २ बाद १२५ अशी भक्कम होती, मात्र कर्णधार कोहली २९ धावांवर बाद झाला आणि भारतीय फलंदाजी ढेपाळली. अवघ्या ७५ धावांत भारताने ८ गडी गमावले. पुजाराशिवाय (७७) कोणीही चांगली खेळी करू शकलं नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे हार्मर व ताहिरने ४ तर फिलँडर व झ्यालने प्रत्येकी १  बळी टिपला. 

Web Title: Happy Diwali - India's D Afridi hit by 108 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.