हॅडिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
By Admin | Updated: September 10, 2015 01:07 IST2015-09-10T01:07:31+5:302015-09-10T01:07:31+5:30
अॅशेज मालिकेतील पराभवानंतर आॅस्ट्रेलियन संघात निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भरच पडत आहे. आता यष्टिरक्षक फलंदाज बॅ्रड हॅडिन याच्या नावाची भर त्यात पडली आहे.

हॅडिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
सिडनी : अॅशेज मालिकेतील पराभवानंतर आॅस्ट्रेलियन संघात निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भरच पडत आहे. आता यष्टिरक्षक फलंदाज बॅ्रड हॅडिन याच्या नावाची भर त्यात पडली आहे. बुधवारी हॅडीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. अॅशेज मालिकेतील पराभवानंतर कसोटी कर्णधार मायकल क्लार्क, शेन वॉटसन आणि ख्रिस रॉजर्स यांनी कसोटीतून निवृत्ती पत्करली. त्यांच्यापाठोपाठ हॅडीननेदेखील कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे.