गुरुसाई, प्रणव-अश्विनी मुख्य फेरीत
By Admin | Updated: May 27, 2015 01:32 IST2015-05-27T01:32:23+5:302015-05-27T01:32:23+5:30
प्रणव चोपडा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र दुहेरी जोडीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान निश्चित केले.

गुरुसाई, प्रणव-अश्विनी मुख्य फेरीत
सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा कांस्य विजेता आरएमव्ही गुरुसाईदत्त याच्यासह प्रणव चोपडा आणि अश्विनी पोनप्पा यांच्या मिश्र दुहेरी जोडीने मंगळवारी आॅस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान निश्चित केले.
गेल्या काही महिन्यांपासून जखमांनी त्रस्त असलेल्या गुरुसाईने मलेशियाचा वेई जियानला २१-१३, २१-९ ने पराभूत करीत पहिला विजय नोंदविला. पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात त्याने जपानच्या काजुमासा साकाईवर २१-१५, २१-८ ने विजय साजरा केला. प्रणव-अश्विनी यांच्या जोडीने जर्मनीचे मार्क लायफस- ईसाबेल हॅरिट्झ यांचा २१-१९, २१-१७ ने पराभव केला. प्रणव-अश्विनी यांनी दुसऱ्या लढतीत चाम चेन आणि सुसान वँग या स्थानिक जोडीवर २१-१४, २१-६ ने विजय मिळवित मुख्य फेरी गाठली. मुख्य फेरी बुधवारपासून सुरू होत आहे. (वृत्तसंस्था)