राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रीतला चौथे जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 20:38 IST
दक्षिण आशियाई गेम्ससाठी 14 सदस्यांची घोषणा, डब्ल्युएफआयकडून 14 सदस्यीय सदस्यांची घोषणा
राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत गुरप्रीतला चौथे जेतेपद
ठळक मुद्दे 210 गुणांसह रेल्वेची शेवटच्या दिवशी अव्वल स्थानी
नवी दिल्ली : रविवारी जालंधरमध्ये टाटा मोटर्सच्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या अंतिम दिवशी गुरप्रीत सिंग आणि सुनील कुमार दोघांनी सुवर्णपदक मिळवत आपली प्रतिष्ठा कायम ठेवली.गुरप्रीत यांचे हे चौथे वरिष्ठ राष्ट्रीय पदक होते. पंजाबच्या या मल्लाने दोन वेळा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचे पदक विजेते सजन भानवालला नमविले. त्याने रेल्वेचे प्रतिनिधीत्व केले. गुरप्रीतने आपल्या तरुण प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व कायम ठेवले आणि आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली. सुनिलने पंजाबच्या प्रभाळवर विजय मिळवला. रेल्वेच्या या मल्लाने पंजाबच्या खेळाडूवर 5-1 असा विजय नोंदवला.
55 किलो वजनी गटात कर्नाटकाच्या अर्जुनने सर्व्हिसेसचे प्रतिनिधित्व केले आणि अजयचा 9-0 ने पराभव करून सुवर्ण जिंकले. चाहत्यांच्या पाठींब्याची आनंद घेत पंजाबच्या हरप्रीत सिंगने रेल्वेच्या राजबीर चिकाराला 4-1ने पराभूत केले. आशियाई गेम्सच्या रौप्यपदकाच्या विजेत्याने आपल्या अनुभवाचा उपयोग करून प्रतिस्पर्ध्याचा आत्मविश्वास उंचावला आणि 82 किलो गटात विजेतेपद जिंकले. ऑलिम्पिकमध्ये पात्रता मिळविणारा पहिला ग्रीको-रोमन कुस्तीपटू असलेल्या हरदीपसिंगला 97 किलोमध्ये रेल्वेच्या रवी राठीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला. रेल्वेने 210 गुणांसह अव्वल स्थान मिळवले तर, सर्विसेसने दुसरे स्थान (170 गुण) पटकावले.तर, झारखंडने 109 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. दक्षिण आशियाई स्पर्धेत साक्षी व रविंदर भारतीय चमूचे प्रतिनिधित्व करतील.दरम्यान, टाटा मोटर्सच्या वरिष्ठ कुस्ती राष्ट्रीय चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणा -या खेळाडूंचा भारतीय कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाने (डब्ल्यूएफआय) जाहीर केलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या संघात समावेश आहे. सात सदस्यीय पुरुष व महिला चमूचे नेतृत्व ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक व 23 वर्षाखाली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रविंदर करणार आहे. स्पर्धा 6 ते 9 डिसेंबर दरम्यान नेपाळ येथे येईल.डब्ल्यूएफआय अध्यक्ष ब्रिजभूषण सरन सिंग म्हणाले, राष्ट्रीय व्यासपीठावरुन अत्यंत स्पर्धात्मक स्पर्धेनंतर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे आणि मला विश्वास आहे की दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमधील पुरुष आणि महिला या दोन्ही गटात खेळाडू वर्चस्व कायम ठेवतील आणि 2016 च्या जेतेपदाचा बचाव करतील.