गुजरातनं कोलकातावर मिळवला दणदणीत विजय
By Admin | Updated: April 22, 2017 08:37 IST2017-04-22T00:02:11+5:302017-04-22T08:37:50+5:30
कोलकाता नाइट रायडर्सनं दिलेलं 188 धावांचं लक्ष्य पार करत गुजरातनं 4 गडी राखून विजय साजरा केला आहे

गुजरातनं कोलकातावर मिळवला दणदणीत विजय
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 21 - कोलकाता नाइट रायडर्सनं दिलेलं 188 धावांचं लक्ष्य पार करत गुजरातनं 4 गडी राखून विजय साजरा केला आहे. रैना आणि जडेजाच्या 58 धावांच्या भागीदारीमुळे गुजरातचा विजय सुनिश्चित झाला. कर्णधार सुरेश रैनानं दमदार फलंदाजीच्या जोरावर 46 चेंडूंत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 84 धावा केल्या आहेत. तर फिंच (31) आणि मॅकक्युलम (33) धावा काढून तंबूत परतले आहेत. एकंदरीतच गुजरात लायन्सनं शानदार फलंदाजीचा नजराणा पेश केला आहे.
तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने तुफान आक्रमण करत गुजरात लायन्सविरुद्ध 10 षटकात 1 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर सुनील नरेनने केवळ 17 चेंडूत 42 धावांचा तडाखा देत गुजरातची गोलंदाजी फोडून काढली होती. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर नाणेफेक जिंकून कर्णधार गौतम गंभीरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
पॉइंट्स टेबल