गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर मिळवला विजय
By Admin | Updated: April 11, 2016 23:43 IST2016-04-11T23:41:15+5:302016-04-11T23:43:01+5:30
ड्वेन ब्राव्होने 4 षटकांत 4 विकेट घेऊन गुजरात लायन्सला विजयाच्या पथावर नेले.

गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर मिळवला विजय
>ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ११ - गुजरात लायन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबनं दिलेलं १६१ धावांचं लक्ष्य पूर्ण करत ५ गडी राखून विजय मिळवला आहे. ड्वेन ब्राव्होने ४ षटकांत ४ विकेट घेऊन गुजरात लायन्सला विजयाच्या पथावर नेले. तर रवींद्र जडेजाने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. मनन व्होरा (३८), मुरली विजय(४२), मार्क्स स्टोइनिस(३३), वृद्धिमान साहा(२०) आणि डेव्हिड मिलर (१५) यांच्या खेळीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने धावा काढल्या. मात्र ड्वेन ब्राव्होनं गुजरात लायन्सला विजयासाठी १७.४ षटकांत १६२ धावा करत विजय संपादन केला आहे.