गुजरात- कोलकाता आज भिडणार
By Admin | Updated: May 19, 2016 05:22 IST2016-05-19T05:22:24+5:302016-05-19T05:22:24+5:30
कर्णधार सुरेश रैनाच्या नेतृत्वात आज गुरुवारी कोलकाता नाईट रायर्डविरुद्ध कडवी झुंज देत विजय मिळविण्याचे आव्हान असेल.

गुजरात- कोलकाता आज भिडणार
कानपूर : आयपीएल इतिहासात सर्वांत मोठा पराभव पत्करणाऱ्या गुजरात लायन्सला नियमित कर्णधार सुरेश रैनाच्या नेतृत्वात आज गुरुवारी कोलकाता नाईट रायर्डविरुद्ध कडवी झुंज देत विजय मिळविण्याचे आव्हान असेल. विजयामुळे गुजरातच्या ‘प्ले आॅफ’ची शक्यता बळकट होणार आहे.
फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू आंद्रे रसेल याच्या अनुपस्थितीमुळे केकेआरला आधीच धक्का बसला. ग्रीन पार्कवर पहिल्यांदा सामना होत आहे. केकेआरने १२ सामन्यात सात विजय आणि पाच पराभवासह १४ गुण मिळविले. आज विजय मिळविल्यास या संघाच्या प्ले आॅफचा मार्ग सुकर होईल. दुसरीकडे पहिल्यांदा स्पर्धा खेळणाऱ्या गुजरातचे देखील १४ गुण आहेत. पण धाव सरासरी खराब असल्याने हा संघ केकेआरपेक्षा खाली घसरला. लायन्सने शानदार सुरुवात करीत काही वेळ अव्वल स्थान राखले होते. नंतर कामगिरीत घसरण होताच आरसीबीकडून मोठ्या पराभवास सामोरे जावे लागले. रैना कन्यारत्न झाल्याने सामना खेळू शकला नव्हता. मात्र आता त्याच्या येण्याने गुजरात संघ मजबूत बनला आहे.
>उभय संघ यातून निवडणार
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), धवल कुलकर्णी, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, जेम्स फॉकनर, ड्वेन ब्राव्हो, प्रवीणकुमार, दिनेश कार्तिक, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, एकलव्य द्विवेदी, ईशान किशन, पारस डोग्रा, प्रदीप सांगवान, आकाशदीप नाथ, अमित मिश्रा, सरबजित लड्ढा, शादाब जकाती, शिवील कौशिक, जयदेव शाह, उमंग शर्मा, अँड्र्यू टे व प्रवीण तांबे.
कोलकाता नाईट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीषपांडे, युसूफ पठाण, सूर्यकुमार यादव, शकिब अल हसन, पीयूष चावला, सुनील नारायण,अंकित राजपूत, मोर्नी मॉर्कल, ख्रिस लिन, कोलिन मुन्रो, ब्रॅड हॉग, शॉन टेट, जेसन होल्डर, उमेश यादव, शेल्डन जॅक्सन, जयदेव उनादकट आणि राजागोपाल सतीश.