गुजरातचा कोलकात्यावर ६ गडी राखून विजय
By Admin | Updated: May 19, 2016 22:59 IST2016-05-19T22:59:01+5:302016-05-19T22:59:01+5:30
कोलकाता नाइट रायडर्सने दिलेले १२४ धावांचे आव्हान गुजरातने ४ गड्यांच्या मोबदल्यात १३.३ षटकात सहज पार केले.

गुजरातचा कोलकात्यावर ६ गडी राखून विजय
>ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. १९ : आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’साठी दावेदारी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात गुजरात लायन्सने बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला गड्यांनी पराभूत करत प्ले 'ऑफ'मधील आपली दावोदारी मजबूत केली. कोलकाता नाइट रायडर्सने दिलेले १२४ धावांचे आव्हान ४ गड्यांच्या मोबदल्यात १३.३ षटकात सहज पार केले. गुजारातकडून अष्टपैलू स्मिथ याने भेदक मारा करताना ४ षटकात ८ धावा देताना ४ फलंदाज बाद केले तर रैनाने कर्णधाराला साजेशी खेळी करताना नाबाद अर्धशतक केले. सुरेश रैनाने ३६ चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५३ धावांची खेळी केली. रैना व्यतिरिक्त स्मिथ आणि मॅक्युलम यांना लौकिकास साजाशी खेळी करण्यात अपयश आले. स्मिथ ० धावावर बाद झाला तर मॅक्युलमने ६ धावा केल्या. सलामीचा जोडी लवकर बाद झाल्यानंर रैनाने कार्तिक आणि फिंचला सोबत घेउन धावसंख्या वाढवण्याचं काम केल. कार्तिक १२ धावावर बाद झाला तर फिंच २६ धावांवर दुर्देवीरित्या धावबाद झाला. जडेजाने १० धावांची खेळी केली.
त्यापुर्वी, गुजरातने नाणेफेक जिंकून कोलकाताला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केले. गुजरात लायन्सने नियंत्रित मारा करताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला २० षटकांत ८ बाद १२४ धावांवर रोखण्यात यश मिळविले. अष्टपैलू स्मिथ याने भेदक मारा करताना ४ षटकात ८ धावा देताना मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, शकिब अल हसन आणि पीयूष चावला यांना बाद करून गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
कर्णधार गौतम गंभीर व उथप्पा या सलामीजोडीने कोलकाताला अपेक्षित आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गंभीर धावबाद झाल्याने कोलकाताला २३ धावांवर पहिला धक्का बसला. शादाब जकातीने केलेल्या अप्रतिम फेकीवर गंभीर धावबाद झाला. गंभीरने ८ चेंडूंत ८ धावा केल्या.
यानंतर स्मिथने आपली कमाल दाखवताना पांडे व उथप्पा या आक्रमक फलंदाजांना फारवेळ टिकून न देता झटपट बाद केले. उथप्पा १९ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २५ धावा काढून परतला, तर पांडे केवळ एक धाव काढून परतला. यानंतर फटकेबाजी करणार पीयूष चावलाही स्मिथच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने कोलकाताची १० षटकांत ४ बाद ५५ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यांतर आक्रमक यसूफ पणाणने आक्रमक खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने ३६ धावांची खेली केली. कुलकर्णी , ब्राव्हो आणि जकातीने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.