गुलेर्मोे ओचोवाने मेक्सिकोला तारले
By Admin | Updated: June 19, 2014 04:58 IST2014-06-19T04:58:25+5:302014-06-19T04:58:25+5:30
मेक्सिकोचा गोलकीपर गुलेर्मोे ओचोवा याने दोन हल्ले शिताफीने थोपवून धरल्यामुळे मंगळवारी रात्री झालेला यजमान ब्राझीलविरुद्धचा सामना गोलशून्यने अनिर्णीत राहिला

गुलेर्मोे ओचोवाने मेक्सिकोला तारले
फोर्टालेझा : मेक्सिकोचा गोलकीपर गुलेर्मोे ओचोवा याने दोन हल्ले शिताफीने थोपवून धरल्यामुळे मंगळवारी रात्री झालेला यजमान ब्राझीलविरुद्धचा सामना गोलशून्यने अनिर्णीत राहिला. अ गटाच्या या सामन्यात ब्राझीलला विजयाची आशा होती; पण प्रतिस्पर्धी गोलकीपरने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
फ्रान्सच्या एसी एजासिओ संघाकडून खेळणारा २८ वर्षांचा ओचोआ याने २६व्या मिनिटाला नेमारचा प्रयत्न परतवून लावला. नेमारचा हेडर त्याने उजवीकडच्या कोपऱ्यात झेप घेऊन अडविला. त्यानंतर ८७व्या मिनिटाला ओचोआने थिएंगो सिल्वा याचा हेडरदेखील रोखला. यामुळे स्टेडियममध्ये जमलेले ब्राझीलचे चाहते निराश झाले होते. क्रोएशियावर ब्राझीलच्या ३-१ने मिळविलेल्या विजयात दोन गोल नोंदविणारा नेमार याने कालदेखील अनेक शानदार मूव्ह बनविल्या; पण मोक्याच्या क्षणी त्याचा प्रयत्न फसल्याने अपयश पदरी पडले.
पाच वेळेच्या विजेत्या ब्राझीलचे खेळावर बराच काळ वर्चस्व होते; पण मेक्सिकोचा बचाव आणि गोलकीपर ओचोआ याला भेदण्यात आक्रमक फळी कमकुवत ठरली. गोलशून्यने अनिर्णीत राहिलेला यंदाच्या विश्वचषकातील हा दुसरा सामना होता. याआधी इराण-नायजेरिया लढत अनिर्णीत राहिली. अ गटात ब्राझील आणि मेक्सिको प्रत्येकी ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहेत. याच गटात क्रोएशिया आणि कॅमेरुनचादेखील समावेश आहे.
पूर्वार्धात आॅस्कर, मार्सेलो आणि नेमार यांनी ब्राझीलकडून सातत्याने हल्लाबोल केला. मार्सेलो १४व्या मिनिटाला जखमी होताच मैदानाबाहेर पडला. फेड आणि पाल्हिन्हो हेदेखील मिळालेल्या संधीचा लाभ घेऊ शकले नाहीत. मेक्सिकोने यादरम्यान आपली बचाव फळी अभेद्य राखली.
२४व्या मिनिटाला त्यांचा खेळाडू हेक्टर हेरारा याचा शॉट ब्राझीलचा खेळाडू ज्युलियो सेसार याने क्लिअर केला. नेमारने २६व्या मिनिटाला डॅनी अल्वेसच्या क्रॉसवर मारलेला हेडर ओचोआने या विश्वचषकात शानदारपणे रोखण्याचा मान मिळविला. ओचोआने ४३व्या मिनिटाला आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. या वेळी नेमारनेच फटका मारला होता.
ब्राझीलचे कोच फिलिप स्कोलारी यांनी रेमीरेजऐवजी बर्नार्डला बदली खेळाडू म्हणून मैदानावत पाठविले.
उत्तरार्धात मेक्सिकोने पल्यिा १५ मिनिटांत काही उत्कृष्ट हल्ले केले, तर ब्राझील संघाने लय गमावल्याचे चित्र
होते. याचा फायदा घेऊन मेक्सिकोच्या खेळाडूंनी तीन लाँग शॉट मारले; पण
तिन्ही शॉट क्रॉसबारच्या वरून निघून
गेले. ओचोआने सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात नेमारच्या फ्री किकवर
थिएगो सिल्वाने मारलेला हेडर रोखून ब्राझीलला विजयापासून दूर ठेवले. (वृत्तसंस्था)