सचिन तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम - सौरव गांगुली
By Admin | Updated: January 21, 2016 15:42 IST2016-01-21T13:26:30+5:302016-01-21T15:42:09+5:30
सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.

सचिन तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम - सौरव गांगुली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये मी अनेक क्रिकेटपटूंना चांगली कामगिरी करताना पाहिले आहे. उदहारणार्थ सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस लक्ष्मण पण या सगळयांमध्ये कोहली सर्वोत्तम आहे. ऑस्ट्रेलियात त्याच्या कामगिरीत दिवसागणिक अधिकाधिक सुधारणा होत आहे असे सैौरवने सांगितले.
ऑस्ट्रेलियात दौ-यात भारतासाठी काही सकारात्मक असेल तर ते विराट कोहली असे सौरवने सांगितले. ऑस्ट्रेलिया दौ-यातील एकदिवसीय मालिकेत विराटने ९३.२५ च्या सरासरीने सर्वाधिक ३७३ धावा केल्या आहेत. पहिल्या सामन्यात ९१, दुस-या सामन्यात ५९, तिस-या सामन्यात ११७ आणि चौथ्या सामन्यात १०६ धावांची खेळी केली.