रशिया, अल्जीरियात ‘महा मुकाबला’
By Admin | Updated: June 26, 2014 02:09 IST2014-06-26T02:09:27+5:302014-06-26T02:09:27+5:30
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटात गुरुवारी रशिया आणि अल्जीरिया हे संघ आमनेसामने येतील़ दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ असा असेल.

रशिया, अल्जीरियात ‘महा मुकाबला’
>क्युरिटा : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत एच गटात गुरुवारी रशिया आणि अल्जीरिया हे संघ आमनेसामने येतील़ दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ असा असेल. विजय मिळाल्यास बाद फेरीत आणि पराभव झाल्यास संघाला घरचा रस्ता धरावा लागणार आह़े
रशिया संघाला आतार्पयत झालेल्या फुटबॉल विश्वचषकात आतार्पयत दुस:या फेरीत धडक मारता आलेली नाही़ त्यामुळे हा संघ अल्जीरियाविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून नवा इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल़ दुसरीकडे, या विश्वकप स्पर्धेत अल्जीरियाने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वाना आश्चर्यचकित केले आह़े अल्जीरियाने पहिल्या लढतीत द. कोरियावर 4-2 असा विजय मिळविला होता, तर दुस:या लढतीत त्यांना अनुभवी बेल्जियम संघाकडून 2-1 अशी मात खावी लागली होती़ या गटातून बेल्जियम संघ सर्वाधिक 6 गुणांसह अंतिम 16 संघात पोहोचला आहे, तर अल्जीरियाच्या खात्यात एका विजयासह 3 गुण आहेत़ रशियाला पराभूत करून हा संघ बाद फेरीत पोहोचू शकतो़ रशियाच्या खात्यात सध्या केवळ एक गुण आह़े (वृत्तसंस्था)