ग्रेट ब्रिटनच्या जलतरणपटूंच्या बॅग गेल्या चोरीला..

By Admin | Updated: August 6, 2016 13:01 IST2016-08-06T06:55:12+5:302016-08-06T13:01:05+5:30

ग्रेट ब्रिटनच्या जलतरण संघातील खेळाडूंच्या 9 बॅगांची चोरी झाल्यामुळे क्रीडाग्राममध्ये खळबळ उडाली आहे.

Great Britain's swimmer bag stole last. | ग्रेट ब्रिटनच्या जलतरणपटूंच्या बॅग गेल्या चोरीला..

ग्रेट ब्रिटनच्या जलतरणपटूंच्या बॅग गेल्या चोरीला..

शिवाजी गोरे, रिओ दी जानेरो -
रिओ, दि. 6 - ग्रेट ब्रिटनच्या जलतरण संघातील खेळाडूंच्या 9 बॅगांची चोरी झाल्यामुळे क्रीडाग्राममध्ये खळबळ उडाली आहे. तेथिल जलतरण तलावावर सरावासाठी गेलेले हे 9 जलतरणपटू आपल्या खोलीमध्ये आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या चोरीच्या प्रकरणामुळे इतर देशाच्या संघातील खेळाडू चिंतेत पडले आहेत. जर असे प्रकारा होणार असतील तर येथे असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा काय फायदा असा सुध्दा प्रश्न सर्वानी उपस्थित केला आहे. त्यामध्ये त्यांचे पैसे, कपडे, ट्रॅकसूट व इतर काही मौल्यवान वस्तू होत्या. या प्रकारामुळे तेथिल सुरक्षा अजून वाढविण्यात आली आहे.
 

Web Title: Great Britain's swimmer bag stole last.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.