सरकारने आमची दखल घ्यावी

By Admin | Updated: July 2, 2015 03:16 IST2015-07-02T03:16:52+5:302015-07-02T03:16:52+5:30

आश्विनी पोनप्पाच्या सोबतीने कॅनडा ओपन बॅडमिंटनचे जेतेपद पटकविणारी स्टार खेळाडू ज्वाला गुट्टा हिने पुढील वर्षी रियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी किमान

The government should take care of us | सरकारने आमची दखल घ्यावी

सरकारने आमची दखल घ्यावी

हैदराबाद : आश्विनी पोनप्पाच्या सोबतीने कॅनडा ओपन बॅडमिंटनचे जेतेपद पटकविणारी स्टार खेळाडू ज्वाला गुट्टा हिने पुढील वर्षी रियो आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी किमान सरकारने आमची मदत करावी, असे आवाहन केले.
ज्वाला येथे परतल्यानंतर म्हणाली, ‘‘आघाडीच्या खेळाडंूना जशी मदतीची गरज असते तीच गरज आम्हालादेखील आहे.
अर्थात, एकेरीतील खेळाडूंना ज्या सुविधा पुरविल्या जातात त्याच सुविधा आम्हाला मिळायला हव्यात. सोयी मिळाल्यास मी आणि
आश्विनी आॅलिम्पिक पदक जिंकू शकतो.
आम्हाला दूर ठेवण्यात ज्यांचा हात असेल त्यांनी आतातरी जागे व्हावे. खेळाडू म्हणून मी सराव करू शकते. आपल्या खेळाचा दर्जा उंचावू शकते. खेळातील उणिवा दूर सारू शकते. मला दिल्लीत कुणाच्या मागे धावण्याची गरज पडू नये. आॅलिम्पिकसाठी दुहेरीत भारताला पदकाची अपेक्षा आहे. यासाठी प्रत्येक स्तरावर सहकार्याची गरज राहील. कॅनडा ओपन जिंकल्यानंतर किमान क्रीडा मंत्रालय आमच्या पाठीशी उभे राहील आणि सहकार्याचा हात देईल, अशी आशा आहे.’’ (वृत्तसंस्था)

बॅडमिंटन खेळाडूंना सरकारचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. एकेरीत खेळाडूंची कामगिरी चांगली होण्यामागील कारण सरकारतर्फे दिली जाणारी मदत हे आहे. सरकारचा पाठिंबा नसेल, तर खेळाडूंना पराभवाचे तोंड पाहावे लागते. खरेतर आम्ही सरकारच्या मदतीवर विसंबून असतो. सरकारकडून पाठिंबा मिळत नसल्याने खेळाडू दुहेरीकडे वळताना धास्तावतात. याशिवाय मिश्र प्रकारातही माझ्यानंतर खेळाडू सापडेनासे झाले आहेत. मी विश्वक्रमवारीत सहाव्या स्थानावर होती, पण त्यानंतर एकही खेळाडू देशातर्फे पुढे आलेला नाही. -ज्वाला गुट्टा

Web Title: The government should take care of us