शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

योगी आदित्यनाथ सरकारचा मोठा निर्णय; 'कुस्ती'ला दत्तक घेतलं, करणार १७० कोटी खर्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 17:15 IST

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व ४ कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. टोक्योतून परतलेल्या या पदकविजेत्यांसह राज्यातील खेळाडूंसाठी उत्तर प्रदेश सरकारनं भव्य सोहळ्याचं आयोजन केलं होतं. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील यशानंतर देशात क्रीडा संस्कृतीची पायामुळं आणखी खोल होताना दिसत आहेत. ओदिशा सरकारप्रमाणे आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारनं कुस्ती या खेळाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना योगी सरकारनं एकूण ४२ कोटींच्या बक्षिसांचे वाटप केले होते.  ( UP government adopts Indian wrestling till 2032 Olympics) 

उत्तर प्रदेश सरकारनं ऑलिम्पिक २०३२पर्यंत कुस्तीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंग यांनी दिली आहे. त्यांनी ओदिशा सरकारकडून प्रेरणा घेत हा निर्णय घेतला आहे. ''ओदिशासारखे लहान राज्य हॉकीला एवढा मोठा पाठिंबा देत असतील, तर मग उत्तर प्रदेश का नाही. हे खूप मोठं राज्य आहे आणि कुस्तीला नेहमी सपोर्ट करत आले आहे. यासाठी आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे  विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली,''असे सिंग यांनी सांगितले. 

२०२४च्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रतीवर्ष १० कोटी खर्च करण्यात यावेत, त्यानंतर २०२८ पर्यंत प्रती वर्ष १५ वर्षा आणि अंतिम टप्प्यात म्हणजे २०३२ पर्यंत प्रतीवर्ष २० कोटी कुस्तीच्या विकासासाठी खर्च करावीत, असा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारकडे ठेवला असल्याचेही सिंग यांनी सांगितले. WFI नं २०१८मध्ये टाटा मोटर्ससोबत प्रिन्सिपल स्पॉन्सर्स म्हणून करार केला आहे.  

यूपी सरकारकडून खेळाडूंचा गौरव...सुवर्णपदक विजेत्या नीरजला दोन कोटींचा धनादेश देण्यात आला. याशिवाय रवि दहिया व मीराबाई चानू या रौप्यपदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी दीड कोटी आणि पी व्ही सिंधू, लवलिना, बजरंग यांच्यासह पुरुष हॉकी संघातील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी एक कोटी बक्षीस दिलं गेलं. टोक्योत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या महिला हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूला ५० लाखांचं बक्षीसही योगी सरकारनं दिले. यासह मीराबाई चानूचे प्रशिक्षक उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद येथील विजय शर्मा यांना १० लाख, पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षकांना २५ लाख व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १०-१० लाख दिले गेले. महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक व साहाय्यक सदस्यांना प्रत्येकी १० लाख दिले गेले. कुस्तीपटू दीपक पूनिया व गोल्फपटू अदिती अशोक यांना प्रत्येकी ५० लाख दिले गेले. टोक्योत सहभागी झालेल्या उत्तर प्रदेशमधील १० खेळाडूंना प्रत्येकी २५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं.   

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशWrestlingकुस्ती