गुगलने जागवल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आठवणी
By Admin | Updated: March 15, 2017 10:35 IST2017-03-15T10:35:03+5:302017-03-15T10:35:03+5:30
आयपीएल, विश्वचषक असे काही सुरू नसताताना अचानक गुगलले क्रिकेटचे डुडल का ठेवलं असावं, बरं. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल

गुगलने जागवल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आठवणी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - आज इंटरनेटवर गुगलचे सर्च इंजिन सुरू केल्यावर क्रिकेटचे डुडल तुम्ही पाहिलेच असेल. आयपीएल, विश्वचषक असे काही सुरू नसताताना अचानक गुगलले क्रिकेटचे डुडल का ठेवलं असावं, बरं. असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आजचा दिवस क्रिकेटमधील खास दिवस आहे. आजच्याच दिवशी क्रिकेटमधील कसोटी सामन्यांच्या पर्वाला सुरुवात झाली होती.
सुमारे 140 वर्षांपूर्वी, 15 मार्च 1877 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये क्रिकेटमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली होती. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक आणि सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान असा लौकीक असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड अर्थात एमसीजीवर हा सामना खेळवला गेला होता.
19 मार्चला आटोपलेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात पहिला चेंडू खेळण्याचा मान ऑस्ट्रेलियाच्या चार्ल्स बॅनरमन यांनी मिळवला होता. तर कसोटी क्रिकेमधील पहिला चेंडू इंग्लंडच्या आल्फ्रेड शॉ यांनी टाकला होता. ऑस्ट्रेलियाचे चार्ल्स बॅनरमन हेच कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे पहिले शतकवीर ठरले होते.
( फुटबॉलसारखे क्रिकेटमध्येही आता रेड कार्ड ! )
( फुटबॉलसारखे क्रिकेटमध्येही आता रेड कार्ड ! )
दरम्यान, या सामन्याची आठवण म्हणून पहिल्या कसोटीच्या शतकपूर्तीवेळी 15 मार्च 1977 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी सामना खेळवला गेला होता. अजब योगायोग म्हणजे त्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने 45 धावांनी विजय मिळवला होता.