पदक जिंकण्याची चांगली संधी : श्रीकांत
By Admin | Updated: July 2, 2017 00:21 IST2017-07-02T00:21:02+5:302017-07-02T00:21:02+5:30
पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची भारतीय खेळाडूंना चांगली संधी असल्याचे इंडोनेशियन आणि आॅस्ट्रेलियन

पदक जिंकण्याची चांगली संधी : श्रीकांत
नवी दिल्ली : पुढील महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकण्याची भारतीय खेळाडूंना चांगली संधी असल्याचे इंडोनेशियन आणि आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिजचा विजेता किदाम्बी श्रीकांत याचे मत आहे.
श्रीकांतसह बी. साईप्रणित आणि अजय जयराम हे पुरुष एकेरीत या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेचे आयोजन ग्लास्गो येथे २१ ते २७ आॅगस्टरम्यान होईल.
क्रीडामंत्री विजय गोयल यांच्याकडून सन्मान स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीकांत म्हणाला, ‘आम्ही सर्व खेळाडू चांगला खेळ करीत आहोत. पदके जिंकूच असे हमखास सांगणार नाही पण आमच्याकडे संधी आहे. त्यासाठी सामन्याच्या दिवशी शंभर टक्के योगदान गरजेचे असेल. इतक्या मोठ्या स्पर्धेसाठी सर्वच खेळाडू कठोर तयारी करतात हे ध्यानात ठेवूनच आम्ही खेळणार आहोत.’
या स्पर्धेत उतरणारे आघाडीचे ३०-३५ खेळाडू कुणावरही मात करण्यास सज्ज असतात. इंडोनेशिया ओपनमध्ये याची प्रचिती आली. २९ व्या स्थानावरील प्रणयने चेन लोंग आणि ली चें वेई यांना पाठोपाठ हरविले. माझा खेळ विश्व चॅम्पियनशिप आधी बहरणे हे देशाच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे, असे श्रीकांत म्हणाला.
गुंटूरच्या या २४ वर्षांच्या खेळाडूला रिओ आॅलिम्पिकनंतर
जखम झाली होती. पाच महिने स्पर्धेबाहेर राहिल्यानंतरही स्वत:च्या क्षमतेवर विश्वास राखल्यामुळे
यशस्वी पुनरागमन करणे शक्य
होऊ शकल्याचे श्रीकांतने
सांगितले. (वृत्तसंस्था)