गोंडवाना रँकिंग टेनिस
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:01+5:302015-01-29T23:17:01+5:30
गोंडवाना क्लब अ.भा. मानांकन टेनिस सामने

गोंडवाना रँकिंग टेनिस
ग ंडवाना क्लब अ.भा. मानांकन टेनिस सामनेबेंद्रे- विश्वकर्मा अंतिम फेरीतनागपूर : मुसंडी मारणारा खेळाडू म्हणून ख्यातीप्राप्त असलेला महाराष्ट्राचा पाचवा मानांकित अन्वित बेंद्रे आणि उत्तर प्रदेशचा तिसरा मानांकित सिद्धार्थ विश्वकर्मा यांनी येथील गोंडवाना कोर्टवर सुरू असलेल्या अ.भा. मानांकन टेनिस स्पर्धेची गुरुवारी अंतिम फेरी गाठली.बेंद्रने दुसऱ्या दिवशी अव्वल मानांकित कनारटकचा प्रबोध याला पराभवाचा धक्का देत अपसेट घडविला होता. उपांत्य सामन्यात त्याने चौथा मानांकित आपलाच सहकारी शाहबाज खान याच्यावर ७-५, ६-४ ने सरळ सेट्समध्ये विजय नोंदविला.विश्वकर्मा याने सहावा मानांकित प. बंगालचा सौरव सुकुल याला पहिला सेट १-६ ने गमावला. पण त्यानंतर स्वत:ला सावरून कडवा संघर्ष केला. त्याने मुसंडी मारणारा खेळ करीत पुढचे दोन्ही सेट्स्७-५, ६-४ ने जिंकले.दुहेरीत अव्वल मानांकित अर्पित शर्मा आणि त्याचा सहकारी सौरव सुकुल या जोडीने शाहबाज खान महाराष्ट्र- विक्रम नायडू कर्नाटक या जोडीवर ६-४, ७-६, १०-५ ने सरशी साधली. पुरुष एकेरीचा अंतिम सामना शुक्रवारी दुपारी सव्वादोन वाजेपासून खेळला जाईल. त्यानंतर दुहेरीचा अंतिम सामना सुरू होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)