गोंडवाना क्लब टेनिस
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:48+5:302015-01-30T21:11:48+5:30
गोंडवाना क्लब अ.भा. रँकिंग टेनिस स्पर्धेत

गोंडवाना क्लब टेनिस
ग ंडवाना क्लब अ.भा. रँकिंग टेनिस स्पर्धेतसिद्धार्थ विश्वकर्मा विजेतानागपूर : उत्तर प्रदेशचा खेळाडू सिद्धार्थ विश्वकर्मा याने महाराष्ट्राचा पाचवा मानांकित अन्वित बेनद्र याचा पराभव करीत गोंडवाना क्लब अ.भा. रँकिंग टेनिस स्पर्धेचे शुक्रवारी पुरुष एकेरीचे जेतेपद पटकविले.गोंडवाना क्लब कोर्टवर झालेल्या अंतिम सामन्यात सिद्धार्थने अन्वितला ६-२, ६-२ ने सरळसेटमध्ये नमविले. सर्वेश सुकुल याने राजस्थानच्या अर्पित शर्मा याचा ६-१, ६-४ ने पराभव केला.क्लबचे अध्यक्ष बालाजी बुटी यांच्याहस्ते पुरस्कार वितरण झाले. यावेळी क्लबचे पदाधिकारी साकेत डागा, जतीन काळे, जमशप बापुना, स्पर्धा संचालक राकेश वढेरा, स्पर्धा सचिव रचना वढेरा, एआयटीए पर्यवेक्षक सुप्रिया चॅटर्जी यांची उपस्थिती होती. संचालन गणेश देशपांडे यांनी केले. (क्रीडा प्रतिनिधी)...................................................................................