सुवर्ण स्वप्न भंगले, सायना नेहवाल पराभूत
By Admin | Updated: March 8, 2015 19:58 IST2015-03-08T19:55:46+5:302015-03-08T19:58:30+5:30
ऑल इंग्लंड बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न अर्धवटच राहिले. रविवारी झालेल्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिनने सायनाचा १६-२१, २१-१४, २१-७ असा पराभव केला.
सुवर्ण स्वप्न भंगले, सायना नेहवाल पराभूत
ऑनलाइन लोकमत
बर्मिंघम, दि. ८ - ऑल इंग्लंड बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न अर्धवटच राहिले. रविवारी झालेल्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिनने सायनाचा १६-२१, २१-१४, २१-७ असा पराभव केला. स्पेनच्या महिला खेळाडूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने ऑल इंग्लंडस्पर्धेच्या फायनलमध्ये धडक देत विक्रम रचला होता. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. रविवारी या स्पर्धेची अंतिम लढत रंगली. सायनासमोर आव्हान होते ते स्पेनच्या २१ वर्षीय कॅरोलिन मरिनचे. सायनाने पहिला २१-१६ ने जिंकून आघाडी घेतली. मात्र यानंतर मरिनने लागोपाठ दोन सेट जिंकत सायनाचा पराभव केला. ६२ मिनीटं हा सामना रंगला होता. मरिन पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरली होती व पदार्पणातच तिने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.