शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

भारतीयांचा सुवर्ण धडाका; ऐश्वर्य तोमरचा दबदबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 07:33 IST

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली

नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या आयएसएफएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या २५ मी. पिस्तूल गटात भारताने एकहाती वर्चस्व राखताना तिन्ही पदकांवर कब्जा केला. यावेळी, चिंकी यादवने सर्वांना प्रभावित करीत राही सरनोबत आणि मनू भाकर या अनुभवी नेमबाजांना मागे टाकत सुवर्णवेध घेतला. त्याचवेळी, पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन गटात भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने सुवर्णपदकावर नाव कोरले. 

या स्पर्धेत झालेल्या कामगिरीद्वारे भारतीय गुणवत्ता पुन्हा एकदा समोर आली. २३ वर्षीय चिंकीने अनुभवी राही सरनोबतला कडवी झुंज देत ३२ गुणांसह बरोबरी साधली. यानंतर झालेल्या शूट-ऑफमध्ये चिंकीने जबरदस्त एकाग्रता दाखवताना राहीला ४-३ असे नमवले. या शानदार कामगिरीसह भारताच्या सुवर्णपदकांची संख्या ९ झाली आहे. १९ वर्षीय मनूला एलिमिनेशन फेरीत २८ गुणांसह कास्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या तिन्ही नेमबाजांनी याआधीच टोकियो ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. 

२०१९ साली १४ व्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकत चिंकीने टोकियोचे तिकीट मिळविले होते. पहिल्या २० नेममध्ये चिंकी १४ गुणांसह आघाडीवर होती, तर मनू १३ गुणांसह मागे होती. यानंतर चिंकीने पूर्ण वर्चस्व मिळवताना २१ गुणांसह आघाडी वाढविली, तर राहीने जबरदस्त पुनरागमन करीत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविले. 

ऐश्वर्य तोमरचा दबदबाभारताचा युवा नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावीत भारताचे अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भोपाळच्या या २० वर्षीय नेमबाजाने ४६२.५ गुणांचा वेध घेत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या धडाक्यापुढे हंगेरीचा स्टार नेमबाज इस्तवान पेनी (४६१.६) आणि डेन्मार्कचा स्टेफेन ओलसेन (४५०.९) यांना अनुक्रमे रौप्य व कास्य पदकावर समाधान मानावे लागले. 

अंतिम फेरीत ऐश्वर्यसोबत अनुभवी संजीव राजपूत आणि नीरज कुमार यांनीही प्रवेश केला होता. मात्र, दोघेही अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानी राहिले. २०१९ साली झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कास्य पदक जिंकत ऐश्वर्यने याआधीच टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळविले होते

नवी दिल्लीत सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीयांनी अव्वल स्थान पटकावत आपल्यवरील भरवसा अधिक मजबूत केला आहे. भारताने कर्णी सिंग शूटिंग रेंज येथे सुरु असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आतापर्यंत ९ सुवर्ण, ५ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण १९ पदकांची लयलूट करत अव्वल स्थान काबिज केले आहे.

टॅग्स :Shootingगोळीबार