झेप मारून जिंकले सुवर्ण

By Admin | Updated: August 16, 2016 20:46 IST2016-08-16T20:46:02+5:302016-08-16T20:46:02+5:30

महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या अंतिम शर्यती बहारिनच्या मिलेर शैनेने हवेत झेप घेऊन अंतिम रेषा पार करीत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.

Gold won by jumping | झेप मारून जिंकले सुवर्ण

झेप मारून जिंकले सुवर्ण

ऑनलाइन लोकमत

रिओ, दि. 16 - महिलांच्या चारशे मीटर धावण्याच्या अंतिम शर्यती बहारिनच्या मिलेर शैनेने हवेत झेप घेऊन अंतिम रेषा पार करीत सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्थापित केला.
महिलांच्या या शर्यतीत अमेरिकेची फेलिक्स आॅलिसन शेवटच्या दोन पावलांपर्यंत पाहिली होती, तिला काही कळायच्या आतच बहारीनच्या मिलरने अचानक हवेत झेप घेऊन अंतिम रेष पार केली आणि अमेरिकेच्या फेलिक्सच्या गोल्ड जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
दुसरीकडे पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत चार धावपटू पुढच्या फेरीसाठी पाक्ष होणार होते. तिसऱ्या फेरीत ब्राझीलचा डी ओलिव्हर जोआ विक्टर हा पाचव्या क्रमांकावर होता. त्याने अंतिम रेषा जशी जवळ आली तसे त्याने हवेत झेप घेऊन ती पार करीत पुढच्या फेरीसाठीच्या यादीत आपल्या नावाची वर्णी केली. 

Web Title: Gold won by jumping