सांघिक कामगिरीनेच सुवर्ण : श्रीजेश
By Admin | Updated: October 4, 2014 01:49 IST2014-10-04T01:49:15+5:302014-10-04T01:49:15+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुवर्ण मिळाले ते केवळ सांघिक कामगिरीमुळेच, अशी प्रतिक्रिया भारताच्या विजयात ‘हिरो’ ठरलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केली.

सांघिक कामगिरीनेच सुवर्ण : श्रीजेश
>इंचियोन : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 16 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुवर्ण मिळाले ते केवळ सांघिक कामगिरीमुळेच, अशी प्रतिक्रिया भारताच्या विजयात ‘हिरो’ ठरलेला गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केली. श्रीजेशने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन केले.
उल्लेखनिय म्हणजे, सामन्यापूर्वी त्याने ‘आजचा दिवस इतिहास रचण्याचा आहे, असे वॉट्सअपवर पोस्ट केले होते. त्यांच्या या पोस्टमुळेही सहका:यांना प्रेरणा मिळाली होती. कदाचित त्याला संघाच्या कामगिरीवर पूर्ण विश्वास होता.
‘सुवर्ण’ विजयानंतर श्रीजेश म्हणाला, पाकिस्तानविरुद्ध संघर्षाची लढत होती. त्यांच्याविरुद्ध खेळण्याचा दबाव तर होताच. मात्र, आम्ही या सामन्यास सहज घेण्याचा प्रयत्न केला. क्-1 अशी पिछाडी भरून काढत आम्ही पेनल्टी शूटआउटवर विजय मिळवला. हे सर्व सांघिक कामगिरीमुळेच शक्य झाले.
कर्णधार सरदार सिंग याने यशाचे श्रेय उत्कृष्ट नियोजन आणि गेल्या काही महिन्यांपासून असलेल्या प्रशिक्षणास दिले. तो म्हणाला, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही खूप मेहनत घेतली. आम्ही विश्वचषक आणि राष्ट्रकूल स्पर्धा खेळलो त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकण्याचे आमचे ध्येय होते. संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान, नियोजनबद्धता यामुळेच सुवर्ण
दिवस साकारता आला. आम्ही
अशीच कामगिरी 2क्16 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतही कायम राखण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास त्याने व्यक्त केला. भारतीय हॉकी
संघाने रियो ऑलिम्पिक स्पर्धेत
सरळ प्रवेश निश्चित केला आहे. त्याआधी, भुवनेश्वर येथे होणा:या चॅम्पियन चषकात संघ सहभागी होईल. (वृत्तसंस्था)