वेगाच्या बादशहाने पुन्हा पटकावले सुवर्णपदक
By Admin | Updated: August 19, 2016 07:31 IST2016-08-19T07:27:59+5:302016-08-19T07:31:34+5:30
वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाच्या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

वेगाच्या बादशहाने पुन्हा पटकावले सुवर्णपदक
>ऑनलाइन लोकमत
रिओ,दि. १९ - 'वेगाचा बादशहा' अशी ओळख असलेला जमैकाच्या उसेन बोल्टने पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या २०० मीटर धावण्याची शर्यत उसेन बोल्टने १९.७८ सेकंदांत पूर्ण करत सुवर्णपदक मिळविले. त्याचे हे रिओ ऑलिम्पिकमधील दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी झालेल्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने ९.८१ सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले होते.
आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धेतील उसेन बोल्टचे हे आठवे सुवर्णपदक आहे.