शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2023 : भारताच्या खात्यात विसावं 'सुवर्ण पदक', दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 12:28 IST

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली.

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. भारतीय संघाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकच्या पत्नीने भारताला सुवर्ण मिळवून देण्यात हातभार लावला. कारण कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकलने चीनमध्ये सातासमुद्रापार देशाची शान वाढवली आहे. तिने स्क्वॅश मिश्र दुहेरीत चमकदार कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. अव्वल मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत द्वितीय मानांकित मलेशियाच्या जोडीचा २-० असा पराभव केला. दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंग यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.

दीपिकाची आशियाई स्पर्धेतील कामगिरी चमकदार राहिली आहे. तिने या पर्वात आतापर्यंत भारताला २ पदके मिळवून दिली. दीपिकाने सांघिक स्पर्धेत प्रथम २ कांस्यपदक जिंकले आणि आता मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी सुवर्ण जिंकले.  दीपिकाचे हे एकूण सहावे पदक आहे. तिला आतापर्यंत एकाही स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यात यश आले नव्हते. पण, यावेळी दीपिकाने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला.

२०१० मध्ये जिंकले होते पहिले पदकदीपिका पल्लीकलने २०१० मध्ये पहिले पदक जिंकले होते. कांस्य पदक जिंकून दीपिकाने पदकांचे खाते उघडले. यानंतर २०१४ मध्ये १ रौप्य, २ कांस्य, २०१८ मध्ये १ कांस्य आणि आता तिने सुवर्ण जिंकले. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Gold medalसुवर्ण पदकDinesh Karthikदिनेश कार्तिकSquash Gameस्क्वॅशIndiaभारत