भारतासाठी सुवर्णदिन, दिवसात 11 पदके

By Admin | Updated: September 28, 2014 01:19 IST2014-09-28T01:19:59+5:302014-09-28T01:19:59+5:30

भारतीय पुरुष स्क्व्ॉश व तिरंदाजी संघांनी ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले. 17व्या आशियाई स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी शुभ ठरला.

Gold medal for India, 11 medals in day | भारतासाठी सुवर्णदिन, दिवसात 11 पदके

भारतासाठी सुवर्णदिन, दिवसात 11 पदके

>पदक तालिकेत भारत 11व्या स्थानी : अभिषेक, चेन सिंग, विनेश, गीतिका, त्रिशा यांनाही पदके
इंचियोन : भारतीय पुरुष स्क्व्ॉश व तिरंदाजी संघांनी ऐतिहासिक कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले. 17व्या आशियाई स्पर्धेत आजचा दिवस भारतासाठी शुभ ठरला. आज भारताने 11 पदके पटकावित पदकतालिकेत 11व्या स्थानावर उडी घेतली. युवा तिरंदाज अभिषेक वर्मा आजच्या दिवसाचा हीरो ठरला. वर्माने रजत चव्हाण व संदीप कुमार यांच्या साथीने कंपाउंड इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळविला. वैयक्तिक इव्हेंटमध्ये अभिषेकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष स्क्व्ॉश संघाने सुवर्णपदक पटकाविले, तर  दीपिका पल्लिकल, अनाका अलंकामोनी व ज्योत्स्ना चिनप्पा यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला स्क्व्ॉश संघाला फायनलमध्ये मलेशियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
या व्यतिरिक्त नेमबाज चैन सिंग (5क् मीटर रायफल थ्री पोङिाशन), तिरंदाज त्रिशा देब (महिला कंपाउंड वैयिक्तक) यांनी कांस्यपदकाचा मान मिळविला. त्रिशा, पूर्वशा शेंडे व ज्योती सुरेखा वेनाम यांचा समावेश असलेल्या तिरंदाजी महिला संघाने कंपाउंड इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. महिला कुस्तीमध्ये विनेश फोगाट (48 किलो), गीतिका जाखड (63 किलो) आणि अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या तीन हजार मीटर स्टिपलचेसमध्ये ललिता बाबरने रौप्य, तर सुधाने कांस्य पटकाविले.
भारताने आज 1क् पदकांची कमाई करताना 16 व्या स्थानावरून उडी घेत 11 वे स्थान पटकाविले. भारताच्या खात्यात 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2क् कांस्यपदकांची नोंद आहे. चीन (96 सुवर्ण, 58 रौप्य व 41 कांस्य) एकूण 195 पदकांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर यजमान दक्षिण कोरिया (35 सुवर्ण, 42 रौप्य, 4क् कांस्य) आणि जपान (32 सुवर्ण, 43 रौप्य व 38 कांस्य) यांचा क्रमांक लागतो. टेनिसमध्ये भारतीय खेळाडूंनी विविध स्पर्धामध्ये उपांत्य फेरी गाठताना किमान पाच पदके निश्चित केली आहेत. भारतीय बॉक्सर्सनी आज चमकदार कामगिरी केली, तर पुरुष हॉकी संघाने अखेरच्या लढतीत चीनचा 2-क् ने पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली. 
मेरी कोम, सरिता, पूजा उपांत्यपूर्व फेरीत
बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती एमसी मेरी कोमने चमकदार सुरुवात करताना कोरियाच्या किम येजीचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. भारताची एल. सरिता देवी (6क् किलो) व पूजा राणी (75 किलो) यांनीही आपापल्या गटात अंतिम आठमध्ये स्थान मिळविले. सरिताने कोरियाच्या चुंगसोन री हिचा 3-क् ने पराभव केला, तर पूजाने मंगोलियाच्या अर्डेनेसोयोल उंडरामविरुद्ध सरशी साधली. 
भारताची पाच पदके निश्चित
भारतीय टेनिसपटूंनी 17व्या आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना किमान पाच पदके निश्चित केली आहेत. युकी भांबरीने पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे, तर पुरुष दुहेरीमध्ये साकेत मायनेनी व सनम सिंग, युकी व विजय शरण त्याचप्रमाणो महिला दुहेरीमध्ये सानिया मिङर व प्रार्थना ठोंबरे आणि मिश्र दुहेरीमध्ये सानिया व साकेत यांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळविले आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सनम सिंगला पराभव स्वीकारावा लागला. संघर्षपूर्ण लढतीत चिनी तैपेईच्या येन सुन लूने सनमचा 7-6, 6-4 ने पराभव केला. युकीने थायलंडच्या दनाई इडोम्चोकेचा 6-3, 
6-2ने पराभव करीत भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली. उपांत्य फेरीत युकीला जपानच्या योशिहितो निशिओकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सानिया व प्रार्थना यांनी दीड तास रंगलेल्या लढतीत थायलंडच्या पिंगतार्न प्लिपुएच व निशा लेर्टपिताकसिंचाइ यांचा 6-1, 7-6ने पराभव केला. यानंतर सानिया-प्रार्थना जोडीला चिनी तैपेईच्या चीन वेइ चान व सु वेई सियेह यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. 
पुरुष दुहेरीमध्ये साकेत व सनम यांनी चिनी तैपेईच्या टी चेन व सियेन यिन पेंग यांचा 6-2, 7-6 ने पराभव केला. युकी व दिविज यांनी चिनी तैपेईच्या येऊ जुऊ वांग व सिन हान ली यांचा 7-5, 7-6 ने पराभव केला. साकेत व सनम यांना पुढच्या फेरीत थायलंडच्या संचाई रतिवताना व सोंचात रतिवताना यांच्याविरुद्ध खेळावे लागेल, तर युकी व दिविज यांची लढत स्थानिक जोडी योंगक्यू लिम व यिओन चुंग यांच्यासोबत होईल. मिश्र दुहेरीमध्ये सानिया व साकेत यांनी कोरियाच्या नलाए हान व चियोंगेऊ किम यांचा 6-3, 7-6 ने पराभव केला. (वृत्तसंस्था)
 
सातारच्या ललिता बाबरला रौप्यपदक
महिलांच्या 3 हजार मीटर स्टेपलचेस शर्यतीत स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक विजेती बहरीनची रुथ जेबेटला पदक ग्रहण करण्यापूर्वीच ट्रॅकच्या आत पाय टाकल्यामुळे बाद करण्यात आले. त्यामुळे साता:याच्या ललिता बाबरला कांस्यपदकाऐवजी रौप्यपदक बहाल करण्यात आले. त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या सुधा सिंगला कांस्यपदक देण्यात आले. 
आशियाई स्पर्धेच्या मुख्य स्टेडियममध्ये आज, शनिवारपासून सुरू झालेल्या अॅथलेटिक्सच्या महिलांच्या 3 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीचा निकाल जाहीर झाला, तेव्हा महाराष्ट्राच्या ललिता बाबरने कांस्यपदक जिंकल्याचे जाहीर झाले, पण नंतर जेव्हा सुवर्णपदक जिंकलेल्या बहरीनच्या रुथ जेबेटने पळताना तिच्या शेवटून दुस:या फेरीत ट्रॅकच्या आत पाय टाकल्याचा अहवाल ट्रॅक अंपायरने शर्यत संपल्यानंतर दिला, तेव्हा पदक ग्रहण करण्यापूर्वीच 17 वर्षीय रुथला बाद घोषित करण्यात आले. त्यामुळे ललिताला रौप्य, तर या क्रीडा प्रकारातील गत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारताच्या सुधा सिंगला कांस्यपदक देण्यात आले. रौप्यपदक जिंकलेल्या चीनच्या ङोन झूलीला (9 मि. 35.23 सेकंद)  सुवर्णपदक देण्यात आले. 
 
विनेश, गीतिका यांना कांस्य
महिला मल्ल विनेश फोगाट व गीतिका जाखड यांनी आशियाई स्पर्धेत महिला कुस्तीमध्ये अनुक्रमे 48 व 63 किलो वजनगटात कांस्यपदक पटकाविताना भारताला चांगली सुरुवात करून दिली. ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणा:या विनेशने कांस्यपदकाच्या लढतीत मंगोलियाच्या नारंगेरेल अर्डेनेसुखचा 2 मिनिट 31 मिनिटांमध्ये पराभव केला. विनेशने 1क्-क् अशी आघाडी मिळविली असताना, रेफरीने लढत थांबविण्याचा निर्णय घेतला. त्याआधी विनेशने उत्तर कोरियाच्या योंगमी पेकचा 3-1 ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. विनेशने उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानच्या डाउलेबाईक याखशीचा पराभव केला, पण उपांत्य फेरीत मात्र जपानच्या एरी तोसाकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.  गीतिकाने कांस्यपदकाच्या लढतीत व्हिएतनामच्या ली थी हियेनचा 55 सेकंदांमध्ये पराभव केला. गीतिकाने गुणांच्या आधारावर पहिल्या लढतीत कझाखस्तानच्या येकातेरिना लारियोनोव्हाचा 3-1 ने पराभव केला. 
 
तिरंदाजांची चमकदार कामगिरी
शनिवारी भारतीय तिरंदाजांनी वर्चस्व गाजविले. भारतीय तिरंदाजी संघाने प्रबळ दावेदार असलेल्या दक्षिण कोरियाचा पराभव करीत प्रथमच टीम कम्पाऊंड इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाचा मान मिळविला. तिरंदाजीमध्ये महिला संघाने इराणचा प्ले ऑफमध्ये पराभव करीत कांस्यपदक पटकाविले. त्यानंतर त्रिशाने वैयक्तिक गटात कांस्यपदकाचा मान मिळविला. रजत, संदीप व अभिषेक यांचा समावेश असलेल्या संघाने अंतिम लढतीत दक्षिण कोरियाच्या यजमान संघाचा 227-225 ने पराभव केला. या स्पर्धेचा एशियाडमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला होता. त्रिशा, पूर्वशा व ज्योती यांनी कांस्यपदकाच्या लढतीत इराणचा 224-217 ने पराभव केला. वैयक्तिक गटात पुरुष विभागात वर्माला इराणच्या इस्माईल इबादीविरुद्ध 141-145 ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे कांस्यवर समाधान मानावे लागले.
 
चैन सिंगला कांस्य
नेमबाजीमध्ये चैन सिंगने अनुभवी गगन नारंग व संजीव राजपूत यांना पिछाडीवर सोडताना 5क् मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये कांस्यपदक पटकाविले. भारतीय नेमबाजाने 441.7 गुणांची कमाई केली. चैन सिंग पात्रता फेरीत सातव्या स्थानी होता. 
 
पुरुष संघाला सुवर्ण, महिला संघाला रौप्य
भारतीय स्क्व्ॉशपटूंनी आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष संघाने सुवर्णपदकाचा मान मिळविला तर महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल यांनी यापूर्वीच वैयक्तिक गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाचा मान मिळविला आहे. भारताची आशियाई स्पर्धेतील स्क्व्ॉशमधील ही सवरेत्तम कामगिरी ठरली आहे. घोषालच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने अंतिम फेरीत मलेशियाचा 2-क् ने पराभव केला. हरिंदर पालसिंग संधूने इसकंदर मोहम्मद अजलान बिनचा 11-8, 11-6, 8-11, 11-4 ने पराभव करीत भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली. त्यानंतर जागतिक क्रमवारीत 16 व्या स्थानावर असलेल्या घोषालने पहिला गेम गमावल्यानंतर चमकदार पुनरागमन करीत जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या ओंग बेंग ली याचा 6-11, 11-7, 11-6, 12-14, 11-9 ने पराभव करीत भारताला 2-क् अशी निर्णायक आघाडी मिळवून दिली. घोषालने यापूर्वी ओंगविरुद्ध एक लढत जिंकली होती तर एका सामन्यात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. पहिला गेम गमावल्यानंतर घोषालने त्यानंतरचे दोन गेम जिंकत 2-1 अशी आघाडी मिळविली. निर्णायक गेममध्ये भारतीय खेळाडूने 1क्-8 अशी आघाडी घेतली होती. ओंगने मॅच पॉईंटचा बचाव केला, पण त्यानंतर घोषालने गुण वसूल करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. स्पर्धेची औपचारिकता पूर्ण करणा:या लढतीतून महेश मनगावकरने मोहम्मद अदनान मोहम्मद नफीजवानविरुद्ध माघार घेतली. त्याआधी महिला संघाला मलेशियाविरुद्ध क्-2 ने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दीपिका पल्लिकल व अनाका अलंकामोनी यांना एकेरीमध्ये आपापल्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
 
चेन्नईच्या आशा कायम
बंगलोर : सांघिक खेळाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील शनिवारी झालेल्या लढतीत पर्थ स्कॉचर्सवर 13 धावांनी विजय साजरा करून उपांत्य फेरीतील आशा कायम राखल्या आहेत. 
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने रवींद्र जडेजाच्या 28 चेंडूंत नाबाद 44 धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या 16 चेंडूंत 35 धावांच्या बळावर निर्धारित 2क् षटकांत 6 बाद 155 धावांचे लक्ष्य उभे केले. त्यानंतर आर अश्विनने आपल्या फिरकीच्या तालावर स्कॉचर्सच्या खेळाडूंना नाचवत 2क् धावांत तीन विकेट्स घेतल्या आणि स्कॉचर्सला 7 बाद 142 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. या विजयाचे o्रेय जाते ते जडेजा आणि धोनी यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या 3क् चेंडूंत 64 धावांच्या भागीदारीला.  चेन्नईची टॉप ऑर्डर ढेपाळल्यानंतर या जोडीने संघाला समाधानकारक मजल मारून दिली. चेन्नईच्या 155 धावांचा पाठलाग करताना स्कॉचर्सची हाराकिरी झाली. नेहराने दोन विकेट घेत चेन्नईच्या विजयात हातभार लावला. (वृत्तसंस्था)
 
तिरंदाजी : भारत विरुद्ध जपान - रिकव्र्ह महिला टीम कांस्य पदक लढत - दीपिका कुमारी, एल. बोमबायला देवी, लक्ष्मीराणी माझी.
अॅथलेटिक्स : पुरुष 2क् किमी रेस वाक फायनल : केटी इरफान व गणपती कृष्णन. महिला 2क् किमी रेस वाक : खुशबीर सिंग. महिला हॅरम थ्रो फायनल - मंजू बाला. महिला 4क्क् मी. फायनल : एम.आर. पूवाम्मा व मंदीप कौर. पुरुष 4क्क् मीटर फायनल - कुंहू मुहम्मद व अरोकिया राजीव. पुरुष 11क् मी. अडथळा शर्यत राऊंड-1 हिट : सिद्धार्थ थिंगालया. महिला हेप्टाथेलॉन 1क्क् मीटर अडथळा शर्यत हिट. महिला हेप्टाथेलॉन उंच उडी ग्रुप अ, महिला हेप्टाथेलॉन गोळा फेक ग्रुप अ, महिला हेप्टाथेलॉन 2क्क् मी. हिट : सप्ना बर्मन व सुष्मिता सिंग राय.
बास्केटबॉल : भारत विरुद्ध जपान : महिला उपांत्यपूर्व फेरी.
बॉक्सिंग : एम.सी. मेरीकोम विरुद्ध सी. हाजुआन - महिला 51 किलो उपांत्यपूर्व फेरी, एल. सरिता देवी विरुद्ध एस. इरदन ओयुंगेरल - महिला 6क् किलो उपांत्यपूर्व फेरी. पूजा राणी विरुद्ध शेन दारा फ्लोरा - महिला 75 कि. उपांत्यपूर्व फेरी. एल.देवेंद्रो सिंग - पुरुष लाईट फ्लाय 49 किलो राऊंड ऑफ 16. 
कॅनो स्प्रिंट : पुरुष व महिला गटातील लढती. 
अश्वारोहण : जंपिंग वैयक्तिक पहिला क्वालिफायर - यशान जुबिन खामबाता, सेहाज विर्क, अशराय बट्टा. जंपिंग टीम राऊंड वन : यशान जुबिन खामबाता, सेहाज विर्क, अशराय बट्टा.
हँडबॉल : पुरुष - भारत विरुद्ध युएई (13 व 14 व्या स्थानासाठी लढत). महिला - भारत विरुद्ध उज्बेकिस्तान (5 ते 8 व्या स्थानासाठी लढत).
कबड्डी : महिला संघ पहिली फेरी - भारत विरुद्ध बांगलादेश. पुरुष : भारत विरुद्ध बांगलादेश.
सेलिंग : जे 8क् ओपम लढत.
टेनिस : पुरुष एकेरी (उपांत्य लढत) - युकी भांबरी विरुद्ध योशिहितो निशियोका. पुरुष दुहेरी उपांत्य फेरी : भारत विरुद्ध थायलंड. महिला दुहेरी उपांत्य फेरी - भारत विरुद्ध चिनी ताईपे. पुरुष दुहेरी उपांत्य फेरी : भारत विरुद्ध दक्षिण कोरिया. मिश्र दुहेरी उपांत्य फेरी - भारत विरुद्ध चीन.
टेबल टेनिस : पुरुष संघ पहिली फेरी - भारत विरुद्ध दक्षिण कोरिया. महिला - भारत विरुद्ध चीन.
व्हॉलिबॉल : पुरुष प्लेऑफ - भारत वि. द. कोरिया
कुस्ती : महिला फ्रिस्टाईल 55 किलो : बबिता कुमारी विरुद्ध श्रेय माओ डार्न. महिला फ्रिस्टाईल 75 किलो उपांत्यपूर्व फेरी : ज्योती विरुद्ध ओचिरबात वर्मा. पुरुष फ्रीस्टाईल 65 किलो : योगेश्वर दत्त विरुद्ध जिन्हयोक कांग. पुरुष फ्रिस्टाईल 97 किलो उपांत्यपूर्व फेरी : सत्यवान कोदियान.
 
देशसुवर्णरौप्यकांस्यएकूण
1चीन965841195
2द. कोरिया35424क्117
3जपान324338113
4कझाकिस्तानक्91क्1837
5उ. कोरियाक्8क्8क्925
11भारतक्3क्52क्28

Web Title: Gold medal for India, 11 medals in day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.