विंडसर्फिंगमध्ये गोव्याचे पदक निश्चित!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 07:00 AM2018-10-15T07:00:00+5:302018-10-15T07:00:00+5:30

डेरिक मिनेझिस यांचे प्रशिक्षक म्हणून नाव आघाडीवर 

Goa's medal in windsurfing fixed! | विंडसर्फिंगमध्ये गोव्याचे पदक निश्चित!

विंडसर्फिंगमध्ये गोव्याचे पदक निश्चित!

Next

सचिन कोरडे : गोव्याला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या या गोव्यात कुशाग्रतेचीही कमतरता नसल्याने येथे विंडसर्फर आणि सेलर्स मोठ्या प्रमाणात आहेत. नव्या विंडसर्फर्सला गरज आहे ती केवळ त्यांना पुढे आणण्याची. त्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्यास गोव्यातील विंडसर्फर्स देशाचे नाव उज्ज्वल करतील. काही उदयोन्मुख खेळाडू चमकदार कामगिरी करीत आहेत, असे सांगताना आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विंडसर्फिंगमध्ये गोव्याला पदक निश्चित असेल, असा विश्वास माजी राष्ट्रीय चॅम्पियन डेरिक मिनेझिस यांनी व्यक्त केला.
दहा वेळा राष्ट्रीय विजेते ठरलेले डेरिक यांचे नाव राज्य संघाचे प्रशिक्षक म्हणून आघाडीवर आहे. ते सुद्धा राज्याचा संघ तयार करण्यास उत्सुक आहेत. डेरिक यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. 
ते म्हणाले, कात्या आणि ड्वेन कुएलो या भावंडांनी राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली आहे. नुकतीच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी ही गोमंतकीय जोडी  पहिलीच होती. अनुभव कमी असल्याने अपेक्षित निकाल मिळाला नाही. परंतु, आशियाई पातळीपर्यंत झेप घेणे ही सुद्धा मोठी कामगिरी असते. या दोघांसोबत इतरही चांगले खेळाडू गोमंत भूमीत आहेत. गोवा आणि समुद्राचे अतूट नाते असल्याने या भूमीत चांगले विंडसर्फर घडलेले आहेत. त्यात रौनक पै, रसेल लोबो, कियोना राजानी, एविलीओ फर्नांडिस यांचा समावेश आहे. विंडसर्फिंग आणि सेलिंगसाठी सर्वात अडचणीचे असते ते म्हणजे साधने. ही साधने उपलब्ध झाल्यास खेळाडूंना तयार करण्यास सोपे जाईल. कारण या खेळातही आता मोठे तांत्रिक बदल झाले आहेत. त्यामुळे सरकारकडून मदत मिळेल, अशी अपेक्षा करतो. माझ्यावर राज्य संघाला तयार करण्याची जबाबदारी दिल्यास ती मी माझ्यापरीने उत्कृष्टरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करीन. प्रशिक्षक म्हणून मलाही सुद्धा त्याचा अभिमान वाटेल, असेही डेरिक यांनी सांगतले.
दुसरीकडे, डेरिक यांचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर असल्याचे गोवा यॉटिंग असोसिएशन अध्यक्ष सिद्धार्थ सातर्डेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की डेरिक यांच्यासारखे अनुभवी प्रशिक्षक गोव्यात असणे म्हणजे भाग्यच. त्यांनी नौसेना आणि भारतीय सेना यांच्या संघांना प्रशिक्षित केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सेनेने २०१६ मध्ये राष्ट्रीय सुवर्णपदक पटकाविले होते.ते स्वत: दहा वेळचे राष्ट्रीय चॅम्पियन आहेत. निश्चितच, त्याचे मार्गदर्शन खेळाडूंना मौल्यवान ठरेल. परंतु, खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या निवडीसाठी गोवा क्रीडा प्राधिकरणा आणि क्रीडा संचालनालया यांच्याकडून प्रक्रीय जलद व्हायला हवी. खेळाडूंना लवकर साधने उपल्ध झाल्यास त्यांचे सराव शिबिर लवकर सुरु करता येईल.

Web Title: Goa's medal in windsurfing fixed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा