दिल्लीला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य

By Admin | Updated: May 3, 2016 21:43 IST2016-05-03T21:43:13+5:302016-05-03T21:43:13+5:30

दिनेश कार्तिक आणि जडेजा दमदार फलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने गृहमैदानावर निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावां केल्या

Goals of 150 to win Delhi | दिल्लीला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य

दिल्लीला विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य

>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. ३ - दिनेश कार्तिक आणि जडेजा दमदार फलंदाजीच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने गृहमैदानावर निर्धारित २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १४९ धावां केल्या. दिल्ली डेअरडेव्हिल्सला स्पर्धेत विजयात सातत्य राखण्यासाठी १५० धावांची गरज आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरवातीपासूनच अचूक मारा करत गुजरातच्या तगड्या फलंदीजीला बांधून ठेवले. स्मिथ(१५) - मॅक्युलम(१) -फिंच (५) या स्फोटक फंलदाजांना ४ षटकातचं माघारी झाडण्यात दिल्लीला यश आले.
 
आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर रैना-कार्तिकने संयमी धावसंख्या वाढवली. रैना कार्तिक जाडीने ७ षटकात ५१ धावांची भागीदारी केली. रैना धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात २४ धावावर बाद झाला. कार्तिकने चिवट फलंदाजी करताना ५ चौकारांच्या मदतीने ४३ चेंडूत ५३ धावांची उपउक्त खेळी केली. कार्तिक बाद झाल्यानंतर फॉक्नरही(७) स्वस्तात बाद झाला. जडेजाने ४ चौकार आणि १ षटकार लगावत २६ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली.  
 
दिल्लीतर्फे नदीमने २ फलंदाजांना बाद केले. मॉरिस, झहीर खान, मिश्रा आणि शमीने प्रत्येकी १ फलंदाजांना बाद केले.
 

Web Title: Goals of 150 to win Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.