शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

विजयी ‘ट्रॅक’वर येण्याचे लक्ष्य

By admin | Updated: December 17, 2014 01:43 IST

थरारक अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे.

ब्रिसबन : भावानिक आणि थरारक अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. या कसोटीत दोन्ही संघ विजयासाठी रस्सीखेच करण्यासाठी बाहू सरसावून सज्ज झाले आहेत. मात्र, या कसोटीत आॅस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघाचे नेतृत्व बदलल्याने त्यांच्यातील चुरस आणखीन वाढली आहे. मायकल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे, तर दुखापतीतून सावरल्यामुळे भारताला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी महेंद्रसिंग धोनी तयार आहे. दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ आक्रमक खेळ करतील, असा निर्धार सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांनी व्यक्त केला आहे.
आॅस्ट्रेलियाने अ‍ॅडिलेड कसोटीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताला या लढतीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आले आहे आणि मालिकेत कमबॅक करण्याच्या त्यांच्या आशा दुणावल्या आहेत.
आॅस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरणार आहे. आॅसी संघाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे.
कर्णधार धोनी याचे विश्रांतीनंतर संघात कमबॅक हे फायद्याचे ठरणार आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांचा अभ्यास धोनीने केलाच असावा आणि त्यावर तोडगा काढून तो या दुसऱ्या कसोटीची रणनिती आखेल. या विश्रांतीमुळे धोनीही नव्या दमाने मैदानावर उतरणार असल्याने संघ चांगली कामगिरी करेल, हे निश्चित आहे. पहिल्या कसोटीत फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या चुका सुधारल्यास भारत दुसऱ्या सामन्यात मुसंंडी मारेल हे नक्की आहे.
सलामीवीरांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शिखर धवनने निराश केले, तर तळाच्या फलंदाजांनाही फार चमक दाखविता आलेली नाही. विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर येताना दोन्ही डावांत शतक ठोकून शाही कमबॅक केले, तर मुरली विजयने दोन डावांत मिळून १५२ धावा चोपल्या. या दोघांना शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्माकडून हवी तशी मदत मिळालेली नाही. गोलंदाजीतही भारताला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इशांत शर्मा, वरूण अ‍ॅरोन, मोहम्मद शमी यांचे अपयश आॅसींच्या पथ्यावर पडले. कर्ण शर्माला प्रभाव पाडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)