आइस स्केटर्स प्रशिक्षणासाठी टर्कीला जाणार

By Admin | Updated: June 4, 2015 01:32 IST2015-06-04T01:32:25+5:302015-06-04T01:32:43+5:30

साऊथ कोरिया येथे होणाऱ्या आगामी २०१८ साली होणाऱ्या विंटर आॅलिम्पिक गेम्ससाठी भारतीय आइस स्केटर संघ टर्कीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे

Go to Turkey for the training of ice skaters | आइस स्केटर्स प्रशिक्षणासाठी टर्कीला जाणार

आइस स्केटर्स प्रशिक्षणासाठी टर्कीला जाणार

मुंबई : साऊथ कोरिया येथे होणाऱ्या आगामी २०१८ साली होणाऱ्या विंटर आॅलिम्पिक गेम्ससाठी भारतीय आइस स्केटर संघ टर्कीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे. ९ ते १२ वर्षे वयोगटातील ९ आइस स्केटर व एक प्रशिक्षक असा १० सदस्यांचा संघ १२ ते १७ जून या कालावधीत टर्कीला जाईल. दखल घेण्याची बाब म्हणजे या दौऱ्याचा सर्व खर्च आइस स्केटिंग असोसिएशन आॅफ इंडिया व सहभागी अ‍ॅथलिट मिळून करणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरासाठी आर्थिक अडचण असल्याने अ‍ॅथलिट फंड गोळा करण्यात सध्या व्यस्त आहेत. इच्छुक देणगीदारांनी भारतीय संघाला मदत करण्याचे आवाहन करताना संघटनेचे सचिव आर. के. गुप्ता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पालक संघातर्फे दरवर्षी २५ लाख रुपये भारतीय असोसिएशनला मिळतात. त्यातुनच अ‍ॅथलिटच्या विविध दौऱ्यांवर, देशांतर्गत प्रशिक्षणासाठी वाहतुकीवर खर्च करण्यात येतो. बिगीनिंग- इंटरमिजिएट - अ‍ॅडव्हान्स - एलिट- प्रो एलिट या नंतर आॅलम्पिक अशा पद्धतीने संघाचा प्रवास सुरू असतो. यानुसार भारतीय संघ एलिट पातळीच्या सरावासाठी टर्कीला जाणार आहे. सध्या भारतात इनडोअर ३ तर आऊटडोअर ४ आइस रिंक सरावासाठी उपलब्ध असून, डेहराडून येथील महाराणा प्रताप स्पोटर््स कॉप्लेक्समधील आॅलम्पिक दर्जाची रिंक राजकीय हस्तक्षेपामुळे बंद आहे, तर भांडुप येथील रिंक वीज बिल परवडत नसल्याने बंद करण्यात आली. भारतात आइस रिंक नसतानादेखील या खेळाडूंनी जिद्दीच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, असे संघाचे प्रशिक्षक अवधूत तावडे यांनी सांगितले. आॅलम्पिकचे लक्ष्य बाळगलेल्या या संघात मुंबईचे सर्वाधिक ४ खेळाडू असून, पुण्याचे तीन तर मंगलोर आणि बंगळुरूच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. फिगर स्केटिंग, शॉर्ट टाइम स्पीड स्केटिंग आणि स्पीड स्केटिंग यासाठी भारतीय संघ आपले कसब दाखवेल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Go to Turkey for the training of ice skaters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.