वैभवीचा झंझावाती खेळ

By Admin | Updated: January 28, 2015 04:42 IST2015-01-28T04:42:50+5:302015-01-28T04:42:50+5:30

बिगरमानांकित गुजरातच्या वैभवी त्रिवेदीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात आठव्या मानांकित दिल्लीच्या शहनाज सिंग हिचा पराभव

Glorious sport | वैभवीचा झंझावाती खेळ

वैभवीचा झंझावाती खेळ

मुंबई : बिगरमानांकित गुजरातच्या वैभवी त्रिवेदीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात आठव्या मानांकित दिल्लीच्या शहनाज सिंग हिचा पराभव करून अखिल भारतीय महिला टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली. महाराष्ट्राच्या आस्था दार्गुडे हिला बिगरमानांकित आंध्र प्रदेशच्या तेराथा इस्का हिच्याकडून पराभव पत्करावा लागला.
पाच महिने दुखापतीमुळे खेळापासून दूर असलेल्या वैभवीने दमदार कमबॅक केले. तिने आक्रमक खेळ करताना ही लढत ७-६ (७-३), ४-६, ७-६ (७-४) अशी जिंकली. पहिल्याच सेटमध्ये वैभवी आणि शहनाज यांच्यात कडवी टक्कर पाहायला मिळाली. टाय ब्रेकरमध्ये रंगलेल्या या सेटमध्ये वैभवीने बाजी मारली. दुसरा सेट मात्र शहनाजने हिरावून घेत सामना १-१ असा बरोबरीत आणला. निर्णायक सेटमध्ये चुरस आणखीनच रडली आणि वैभवीने अप्रतिम खेळ करून विजय निश्चित केला.
इतर लढतीत अव्वल मानांकित गुजरातच्या ऐटी महेता हिने एकही गेम न गमावता दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला. गतविजेत्या आणि दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या हिमानी मोर, तामिळनाडूची एम़ आर्थी, आंध्र प्रदेशच्या अक्षरा इस्का, दिल्लीच्या मान्या नागपाल आणि कर्नाटकच्या प्रीती उज्जीनी यांनी आगेकूच केली. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Glorious sport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.