शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मिठाईचा त्याग अन् अनेक रात्री जागरण! सुमित अंतिलच्या सुवर्णामागची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 06:38 IST

Sumit Antil: दीर्घ काळापासून पाठदुखीने त्रस्त असलेला भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल याच्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदकामागे त्यागाची मोठी कहाणी आहे. त्यात मिठाईचा त्याग आणि अनेक रात्रींच्या जागरणाचाही समावेश आहे.

पॅरिस -  दीर्घ काळापासून पाठदुखीने त्रस्त असलेला भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल याच्या पॅरिस पॅरालिम्पिकमधील सुवर्ण पदकामागे त्यागाची मोठी कहाणी आहे. त्यात मिठाईचा त्याग आणि अनेक रात्रींच्या जागरणाचाही समावेश आहे.

पॅरालिम्पिकआधी झपाट्याने वजन वाढण्याच्या आव्हानामुळे सुमितला आपल्या आवडत्या मिठाईचा त्याग करावा लागला. त्याशिवाय गतवर्षी हांगझोऊ पॅरा आशियाई स्पर्धेत कंबरेला झालेली दुखापत त्रस्त करत होती. फिजिओच्या सल्ल्याने सुमितने मिठाई खाणे बंद केले आणि आहार नियंत्रित केला. त्याने दोन महिन्यांत १२ किलो वजन कमी केले. पॅरालिम्पिक विजेतेपद राखणारा तो दुसरा भारतीय खेळाडू बनला, तेव्हा त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याने पॅरालिम्पिकमध्ये ७०.५९ मीटरचा नवा विक्रमही नोंदवला. 

सुमित म्हणाला की, ‘मी १० ते १२ किलो वजन कमी केले. माझे फिजिओ विपिन भाई यांनी सांगितले की, वजनामुळे मणक्यावर दबाव पडत आहे. त्यामुळे मी गोड खाणे बंद केले. योग्य आहार घेण्यावर भर दिला. मी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हतो. मला भाला फेकण्याआधी पेनकिलर गोळी घ्यावी लागली. सरावादरम्यान मी सर्वोत्तम स्थितीत नव्हतो.’सुमित पुढे म्हणाला की, ‘सगळ्यात आधी मला कंबरेवर उपचार घ्यायचे आहेत. दुखापत मोठी होऊ नये यासाठी मी खूप जपून खेळलो. तंदुरुस्तीसाठी मी व्यायामही सुरू केला आहे. प्रशिक्षक अरुण कुमार यांच्यासोबत मला दोन वर्षे झाली आहेत. मला कधी आणि काय हवे आहे ते त्यांना माहीत आहे. मी त्यांना रात्रभर जागून रणनीती तयार करताना पाहिले आहे.’ 

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाIndiaभारत