'त्यांना' दिलं सेहवागनं आव्हान

By Admin | Updated: July 27, 2016 22:19 IST2016-07-27T21:50:09+5:302016-07-27T22:19:25+5:30

बॉर्डरसाहेब आम्ही बॉर्डर नावचा चित्रपटच बनवला. तुम्ही अजून गावस्कर बनवू शकला नाहीत.आता तेंडुलकर तरी बना', असे एलन बॉर्डर यांना म्हटले आहे.

Give them 'Sehwag' challenge | 'त्यांना' दिलं सेहवागनं आव्हान

'त्यांना' दिलं सेहवागनं आव्हान

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - ऑस्ट्रेलियाचे ख्यातनाम क्रिकेटपटू एलन बॉर्डर यांना त्यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या जगभरातल्या बहुतेक सर्व क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. मात्र भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने जरा हटके स्टाईलमध्ये त्यांना शुभेच्छा देतानाच आव्हानाची भाषा केली आहे.
 
सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छांमधून एक प्रकारचं आव्हानच दिलं आहे. 'हॅपी बर्थडे एल बॉर्डर. लहानपणी मी एक विनोद ऐकला होता. पण बॉर्डरसाहेब आम्ही बॉर्डर नावचा चित्रपटच बनवला. तुम्ही अजून गावस्कर बनवू शकला नाहीत.आता तेंडुलकर तरी बना', असे एलन बॉर्डर यांना म्हटले आहे. सेहवागच्या या विनोदी शैलीमुळे सोशल मीडियावर त्याच्या प्रतिक्रियेची खूपच चर्चा आहे.
 
यापूर्वीसुद्धा अनेकदा सेहवागने आपल्या हटके स्टाईलमध्ये अनेक सेलिब्रेटींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच सेहवागने ट्विटरवरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलची खिल्ली उडवली होती. त्यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र काही का असेना पण सेहवागच्या या गमतीशीर प्रतिक्रियांची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. 
 

Web Title: Give them 'Sehwag' challenge