शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

गीताच्या आईला हवा होता मुलगा

By admin | Updated: December 22, 2016 00:19 IST

भारताची स्टार महिला मल्ल गीता फोगट हिचे मार्गदर्शक व वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची सध्या

नवी दिल्ली : भारताची स्टार महिला मल्ल गीता फोगट हिचे मार्गदर्शक व वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे यामध्ये नमूद केल्यानुसार गीताच्या जन्मानंतर तिची आई निराश झाली होती. कारण त्यांना मुलगा हवा होता. फोगट यांच्यावरील पुस्तकामध्ये असे नमूद केले असल्याने सध्या याची खूप चर्चा आहे.या पुस्तकामध्ये म्हटले आहे की, जेव्हा महावीर यांना आपले पहिले अपत्य मुलगी असल्याचे कळाले तेव्हा ते निराश झाले नाहीत; परंतु गीताची आई निराश झाली होती. ही गोष्ट १९८८ सालची आहे. परंतु, गीताने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरविताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. ७ आॅक्टोबर २०१० साली गीताने आॅस्टे्रलियाच्या एमिली बेन्स्टेडला लोळवून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पटकाविणारी पहिली भारतीय महिला असा इतिहास रचला. दखल घेण्याची बाब म्हणजे, स्त्री-भ्रूणहत्येसाठी कुप्रसिद्ध असलेल्या हरियाणा राज्याची गीता असल्याने तिने केलेला पराक्रम विशेष ठरतो.या पुस्तकात म्हटले आहे की, ‘१९८८ सालची तो थंडीतील सकाळचा दिवस होता, जेव्हा महावीर आपल्या मुलीच्या जन्माची बातमी गर्वाने सांगत होते. त्या दिवशी त्यांनी गीताला आपल्या कुशीत घेऊन घोषणा केली होती की, ही मुलगी एक दिवस परिवाराचे नाव उंचावेल.’ महावीर यांनी कशाप्रकारे अनेक अडचणींना सामोरे जात आपल्या दोन्ही मुली आॅलिम्पियन गीता आणि बबिता कुमारी यांना घडविले याची माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात लिहिण्यात आले आहे की, ‘कोणीही महावीर यांच्या मनाची स्थिती समजू शकतं. ते ८०च्या अशा दशकात मुलीचे वडील झाले होते, जेव्हा मुलीला ओझं मानलं जायचे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे पहिले अपत्य मुलगा व्हावे, अशी अपेक्षा महावीर यांची कधीच नव्हती, तर ती अपेक्षा त्यांची पत्नी दया कौर यांची होती.’ (वृत्तसंस्था)