शिर्ला येथील मुले,भंडारजच्या मुलींनी मारली बाजी शालेय कबड्डी स्पर्धेत अनेक शाळांनी घेतला सहभाग
By Admin | Updated: December 2, 2014 00:36 IST2014-12-02T00:36:00+5:302014-12-02T00:36:00+5:30
शिर्ला : येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या सर्कलस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये शिर्ला येथील जि.प. शाळेच्या मुलांनी, तर भंडारज येथील जि.प. शाळेच्या मुलींनी बाजी मारली. त्यांनी अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात जिगरबाज खेळ केला.

शिर्ला येथील मुले,भंडारजच्या मुलींनी मारली बाजी शालेय कबड्डी स्पर्धेत अनेक शाळांनी घेतला सहभाग
श र्ला : येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या सर्कलस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये शिर्ला येथील जि.प. शाळेच्या मुलांनी, तर भंडारज येथील जि.प. शाळेच्या मुलींनी बाजी मारली. त्यांनी अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात जिगरबाज खेळ केला. दोन दिवसीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन शिर्ला येथे नुकतेच करण्यात आले होते. उद्घाटन जि.प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत कबड्डी , खो-खो, लंगडी, व्हॉलीबॉल , क्रिकेट , फुटबॉल या सांघिक क्रीडाप्रकारांचे सामने झाले तसेच तसेच १००, २००, ४०० मीटर शर्यत, टप्पा पद्धतीने धावणे, मल्लखांब या वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्येही विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. शिर्ला व भंडारज ही गावे कबड्डीसाठी पंचक्रोशीत ओळखली जातात. त्यानुसार येथील मुले व मुलींच्या संघाने आपआपल्या गटात बाजी मारली. शिर्ला सर्कलमधील शिर्ला, भंडारज बु. , तांदळी बु., देऊळगाव, भानोरा, मलकापूर, पातूर येथील शाळांच्या संघांनी व खेळाडूंनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. आयोजनासाठी जि.प. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पु. ना. केदार , किशोर निलखन यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)फोटो क्रमांक : ०२ सीटीसीएल ५१ शालेय क्रीडा स्पर्धेत रंगलेल्या कबड्डीच्या सामन्यातील एक क्षण.