शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिद्दीच्या बळावर घातली गिरीशिखराला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 5:37 AM

जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर । माउंट मकालू सर करणारी देशातील पहिली महिला

कुलदीप घायवट ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर असलेले माउंट मकालू सर करणारी देशातील पहिली महिला गिर्यारोहक प्रियांका मोहिते ठरली आहे. नेपाळ व चीन देशांच्या हद्दीवरील ८ हजार ४६३ मीटर उंचीचे हे हिमशिखर प्रियांकाने वयाच्या २६व्या वर्षी सर केले. या कामगिरीमुळे प्रियांकाचे देशभरातून कौतुक होत आहे.

१८ एप्रिल, २०१९ रोजी माउंट मकालू चढण्यास प्रियांकाने सुरुवात केली. हे शिखर सर करण्यासाठी नेपाळच्या एका ग्रुपने जगातील २२ सदस्यांची निवड केली होती, त्यात प्रियांका होती. तिच्यासोबत लाखपा शेर्पा होता. १५ मे, २०१९ रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास तिने मकालू शिखर पार करून तेथे भारताचा तिरंगा फडकाविला. या आधीने तिने एव्हरेस्ट, ल्होत्से, माउंट किलीमांजारो, माउंट एलब्रुस ही जागतिक दर्जाची हिमशिखरे पार केली आहेत.

जगात ८ हजार मीटर उंचीची १४ शिखरे आहेत. नेपाळ आणि चीन या दोन देशांच्या सीमेवर असलेले माउंट मकालू हे यातील पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे. माउंट मकालूची रचना पिरॅमिडसारखी आहे. या ठिकाणी ताशी पंच्चाहत्तर मैल वेगाने वारे वाहतात. त्यामुळे यावर चढाई करणे आव्हानात्मक आहे.शेवटचा टप्पा खडकाळ असल्याने तो पार करणे अवघड होते. मात्र, जिद्दीने ८ हजार ४६३ मीटरचे माउंट मकालू सर करत, हे शिखर पार करणारी ती देशातील पहिली महिला व कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे.

मागील वर्षी ल्होत्से शिखर पार केल्यानंतर मकालू किंवा मनसलू शिखर सर करण्याचा मानस होता. त्यामुळे मकालू पार केल्याचे समाधान वाटत आहे. आता जगातील ८ हजारपेक्षा जास्त उंचीची शिखरे पार करण्याचे ध्येय आहे, असे प्रियांकाने सांगितले.‘शिवछत्रपती’ पुरस्काराने सन्मानच्मूळची साताऱ्याची असलेल्या प्रियांका मोहिते हिने २०१३ साली सर्वाेच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८ हजार ८५० मीटर) सर केले. त्यानंतर, १६ मे, २०१८ रोजी जगातील चौथ्या क्रमांकाचे अत्युच्च आणि अत्यंत अवघड हिमशिखर माउंट ल्होत्से (८ हजार ५१६ मीटर) यशस्वीरीत्या सर केले.च्प्रियांकाने बीएससीचे शिक्षण घेतले आहे. गिर्यारोहनाची आवड असलेल्या प्रियांकाने सर्वाेच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आणि माउंट ल्होत्से सर केल्याच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र शासनानेही घेतली आहे. नुकताच तिला ‘शिवछत्रपती’ पुरस्कार प्रदान करून शासनाने तिच्या विक्रमाचा सन्मान केला आहे.