जर्मनी
By Admin | Updated: July 5, 2014 00:11 IST2014-07-05T00:11:44+5:302014-07-05T00:11:44+5:30
जर्मनी सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत

जर्मनी
ज ्मनी सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीतयुरोपियन वर्चस्वाची लढाई : फ्रान्सवर १-० ने मात रिओ दी जानेरिओ : मॅट्स ह्युमेल्सने मध्यंतरापूर्वी हेडरद्वारे नोंदविलेला गोल अखेर निर्णायक ठरला. ह्युमेल्सने नोंदविलेल्या गोलच्या जोरावर जर्मनीने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सची झुंज १-० ने मोडून काढली आणि फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत सलग चौथ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली. युरोपियन वर्चस्वाच्या लढाईत अखेर जर्मनीने बाजी मारली.युरोपातील दोन बलाढ्य संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या लढतीत ह्युमेल्सने १३ व्या मिनिटाला गोल नोंदवीत जर्मनीला वर्चस्व मिळवून दिले. जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल नेउरची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने या लढतीत अप्रतिम बचाव करताना फ्रान्सचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न हाणून पाडले. नेउरने अखेरच्या क्षणालाही बचाव अभेद्य राखत जर्मनीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. करेम बेनझेमाने डाव्या पायाने मारलेला जोरकस फटका नेउरने परतावून लावला आणि जर्मनीच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.या लढतीत चेंडूवर अधिक वेळ नियंत्रण जर्मनीचे होते, पण फ्रान्सला सुरुवातीला गोल नोंदविण्याची संधी होती. सातव्या मिनिटाला बेनझेमाला गोल नोंदविण्याची संधी होती, पण त्याला गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीसाठी मैदानात दाखल झालेला फ्रान्स संघ जर्मनीविरुद्ध १९८२ व १९८६ मध्ये उपांत्य फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यास उत्सुक होता. पण मध्यंतरापूर्वी फ्रान्स संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यामुळे जर्मनीला मध्यंतरापूर्वी आघाडी घेण्याची संधी मिळाली. मध्यंतरानंतर फ्रान्स संघाने आक्रमक खेळ केला, पण त्यांना बरोबरी साधण्यात अपयश आले.