गेरार्डने अखेरच्या क्षणाला लिव्हरपूलला तारले !

By Admin | Updated: September 17, 2014 23:03 IST2014-09-17T23:03:07+5:302014-09-17T23:03:07+5:30

स्टीवन गेरार्ड याने 93व्या मिनिटाला पेनल्टीचे रूपांतरण गोलमध्ये करून लिव्हरपूल संघाला चॅम्पियन्स लीग स्पध्रेत लुडोगोरेट्स राजग्रॅडवर 2-1 असा निसटता विजय मिळवून दिला.

Gerard saved Liverpool at the last moment! | गेरार्डने अखेरच्या क्षणाला लिव्हरपूलला तारले !

गेरार्डने अखेरच्या क्षणाला लिव्हरपूलला तारले !

लिव्हरपूल : स्टीवन गेरार्ड याने 93व्या मिनिटाला पेनल्टीचे रूपांतरण गोलमध्ये करून लिव्हरपूल संघाला चॅम्पियन्स लीग स्पध्रेत लुडोगोरेट्स राजग्रॅडवर 2-1 असा निसटता विजय मिळवून दिला. सामना इतका अटीतटीचा झाली की 8क्व्या मिनिटाला दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. हा गुंता 82व्या मिनिटाला मारिओ बॅलोटेलीने सोडवला आणि लिव्हरपूलला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. मात्र लुडोगोरेट्सकडून पुढील दोन मिनिटांतच प्रतिहल्ला झाला आणि डॅनी अॅबालो याने गोल करून समाना 1-1 असा बरोबरीत आणून चुरस आणखी वाढवली. जावी माक्युंलो आणि गेरार्ड यांच्या व्यूहरचनेला अंदाज घेण्यात लुडोगोरेट्सचा गोली मिलान बार्जान याला अपयश आले आणि गेरार्डने  गोल करून लिव्हरपूलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
तत्पूर्वी रिआल माद्रिदने गॅरेथ बॅले, ख्रिस्टियानो रोनाल्डो, ज़े रॉड्रिग्ज आणि क़े बेंजेमा यांच्या झंझावाताच्या बळावर बॅसेलचा 5-1 असा धुव्वा उडविला. 14व्या मिनिटाला मॅरेक सुकी याने स्वयंगोल करून माद्रिदचे खाते उघडले. त्यानंतर बॅले (3क् मि.), रोनाल्डो (31 मि.) आणि रॉड्रिग्ज (37 मि.) यांनी गोल करून ही आघाडी 4-क् अशी भक्कम केली. 38व्या मिनिटाला डी़ गोंझालेज याने बॅसेलसाठी एकमेव गोल केला. 79व्या मिनिटाला  बेंजेमाने गोल करीत माद्रिदचा विजय पक्का केला. (वृत्तसंस्था)
 
2क्
पेक्षा अधिक गोल करणारा स्टीवन गेरार्ड हा चौथा इंग्लिश खेळाडू आहे. यापूर्वी वॅन रुनी (29), स्लोलेस (24) आणि लॅम्पर्ड (23) यांनी ही कामगिरी केली
 
क्8
गोल चॅम्पियन्स लीगमध्ये मारिओ बॅलोटेलीच्या नावावर असून ते आठही गोल त्याने चार वेगवेगळय़ा क्लबमधून केले आहेत. बुधवारच्या लढतीत त्याने पहिला गोल केला. 
 
26
गोल रिआल माद्रिदच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यांनी 2क्14मध्ये खेळलेल्या 8 सामन्यांत ही किमया केली. पहिल्या हाफमध्ये लिव्हरपूलला गोल करण्यात चौथ्यांदा अपयश आले.

 

Web Title: Gerard saved Liverpool at the last moment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.