जननेंद्रीयामुळे 'त्याचे' पदक नाही हुकले

By Admin | Updated: August 18, 2016 16:30 IST2016-08-18T16:30:00+5:302016-08-18T16:30:57+5:30

पार्टी, कार्यक्रमांच्या ठिकाणी अनेकदा प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यांना सेलिब्रिटींचे अपघाताने सेक्सी फोटो मिळतात.

Genetics did not get his 'medal' | जननेंद्रीयामुळे 'त्याचे' पदक नाही हुकले

जननेंद्रीयामुळे 'त्याचे' पदक नाही हुकले

ऑनलाइन लोकमत 

रिओ, दि. १८ - पार्टी, कार्यक्रमांच्या ठिकाणी अनेकदा प्रसारमाध्यमांच्या कॅमे-यांना सेलिब्रिटींचे अपघाताने सेक्सी फोटो मिळतात. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर ते मोठया चवीने पाहिले जातात. ऑलिम्पिक स्पर्धेत कॅमे-याने टिपलेल्या अशाच एका फोटोमुळे जापानी पोल वॉल्ट खेळाडू हिरोकी ओजिताची नाहक बदनामी सुरु आहे. 
 
पोल वॉल्टमध्ये खेळाडूला ठराविक अंतरावरुन धावत येऊन पोलच्या सहाय्याने बारवरुन उडी घ्यावी लागते. हिरोकी ओजिताने पोलच्या सहाय्याने उडी घेतल्यानंतर सर्वप्रथम त्याचे पाय बारला लागले त्यानंतर हातामुळे बार खाली पडला. त्यामुळे हिरोकीचे आव्हान पात्रता फेरीतच संपुष्टात आले. 
 
पण कॅमे-याने हिरोकीचा पॅंटमधील फुगीर  लिंगाचा बारला स्पर्श झाल्याचा फोटो टिपला. या फोटोवरुन लिंगामुळे हिरोकीचे पदक हुकल्याची बातमी अनेकांनी चालवली. परदेशी मिडीया मला इतक्या खाली नेऊन ठेवेल असे मला वाटले नव्हते असे २८ वर्षी ओजिताने टि्वट केले आहे. 

Web Title: Genetics did not get his 'medal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.