गेल झाला फेल
By Admin | Updated: May 26, 2014 01:02 IST2014-05-26T01:02:09+5:302014-05-26T01:02:09+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) गत तीन सत्रांत आपल्या स्फोटक खेळीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारा रॉयल चॅलेंजर्सचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मात्र चालू सत्रात फेल ठरला आहे़

गेल झाला फेल
नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) गत तीन सत्रांत आपल्या स्फोटक खेळीमुळे वेगळी ओळख निर्माण करणारा रॉयल चॅलेंजर्सचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल मात्र चालू सत्रात फेल ठरला आहे़ विशेष म्हणजे चालू सत्रात या आक्रमक खेळाडूला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही़ वेस्ट इंडीजच्या गेलला दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सुरुवातीचे सामने खेळता आले नव्हते़ यानंतर त्याने ९ सामन्यांत बंगळुरूचे प्रतिनिधित्व केले़ या सामन्यांत त्याला विशेष कामगिरी करता आली नाही़ त्याने ९ लढतीत २१़७७ च्या सरासरीने केवळ १९६ धावा केल्या आहेत़ त्याचा स्ट्राईक रेटही केवळ १०६़५२ असा होता़ या ९ डावांत या स्टार खेळाडूला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही़ आयपीएलच्या गत तीन सत्रांत गेलचाच बोलबाला होता़ त्याने २०११ च्या आयपीएल सत्रात १२ सामन्यांत ६८० धावा केल्या होत्या़ त्यानंतर २०१२ मध्येही त्याने १५ सामन्यांत १६० च्या स्ट्राईकरेटने विक्रमी ७३३ धावा केल्या होत्या़ गत आयपीएलमध्येही त्याची बॅट चांगलीच तळपली होती़ त्याने १६ सामन्यांत ७०८ धावा केल्या होत्या़ त्याचा स्ट्राईक रेट १५६़२९ असा होता़ ख्रिस गेलच्या अपयशामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कामगिरीवरही परिणाम झाला आहे़ यावर्षी खेळलेल्या १४ सामन्यांपेकी केवळ ५ मध्ये बंगळुरूला विजय मिळविता आला आहे़ हा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर राहिला आहे़ त्यामुळे त्यांच्यावर प्लेआॅफच्या शर्यतीतून बाहेर होण्याची नामुष्की ओढवली आहे़ षट्कार मारणार्या खेळाडंूत सुरेश रैनाचा दुसरा क्रमांक लागतो़ त्याच्या नावावर आतापर्यंत १२६ षट्कार आहेत़ गेल याने आयपीएलच्या चालू सत्रात केवळ १२ षट्कार खेचले आहेत़ त्याआधी २०११ मध्ये त्याने ४४ षट्कार लगावले होते, तर २०१२ मध्ये ५९ आणि २०१३ मध्ये तब्बल ५१ षट्कार लगावले होते़