ज्युनियर बॅडमिंटनमध्ये गायत्री गोपीचंदला विजेतेपद
By Admin | Updated: April 16, 2017 17:17 IST2017-04-16T17:17:19+5:302017-04-16T17:17:19+5:30
वडलांच्या पावलावर पाऊल टाकत बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरलेल्या गायत्री गोपिचंद हिने आंतराष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीच्या

ज्युनियर बॅडमिंटनमध्ये गायत्री गोपीचंदला विजेतेपद
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आजचा रविवार भारतीय बॅडमिंटनसाठी दुहेरी यश घेऊन आला. एकीकडे साईप्रणिथने आपल्याच देशाच्या श्रीकांतला मात देत विजेतेपद पटकावले. तर दुसरीकडे वडलांच्या पावलावर पाऊल टाकत बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरलेल्या गायत्री गोपिचंद हिने जाकार्ता येथे आयोजित आंतराष्ट्रीय ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी आणि दुहेरीच्या विजेतेपदांवर नाव कोरले.
जाकार्तामध्ये आयोजित ज्युनियर ग्रां.प्रि.मध्ये मुलींच्या एकेरीमध्ये गायत्रीने आपल्याच देशाच्या सामिया इमाद फारुखीवर मात करत 15 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद पटकावले. याच गटात भारताच्या कविप्रिया सेल्वम हिने कांस्यपदक पटकावले. त्याबरोबरच 15 वर्षांखालील मुलींच्या दुहेरीतही गायत्रीचा बोलबाला राहिला. तिने दुहेरीच्या अंतिम लढतीत समीया हिच्यासह दुहेरीचे विजेतेपद पटकावले. दुहेरीमध्ये कविप्रिया आणि मेघना रेड्डीने कांस्यपदक पटकावले.
गायत्री गोपिचंद, सामिया इमाद फारुखी, कविप्रिया सेल्वम आणि मेघना रेड्डी या चारही जणी हैदराबादमधील पुलैला गोपिचंद राष्ट्रीय बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडू आहेत. गोपिचंद अकादमीने प्रथमच आपल्या खेळाडूंना 15 वर्षाखालील स्पर्घेसाठी परदेशात पाठवले होते.