गौतमविषयी निवड समिती नाही ‘गंभीर’

By Admin | Updated: July 23, 2015 23:02 IST2015-07-23T23:02:53+5:302015-07-23T23:02:53+5:30

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याचा भारतीय संघात समावेश करण्याबाबत निवड समिती तितकीशी गंभीर नाही

Gautam's selection committee is not 'serious' | गौतमविषयी निवड समिती नाही ‘गंभीर’

गौतमविषयी निवड समिती नाही ‘गंभीर’

नवी दिल्ली : आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी सलामीचा फलंदाज गौतम गंभीर याचा भारतीय संघात समावेश करण्याबाबत निवड समिती तितकीशी गंभीर नाही. निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील यांनीच त्याच्या निवडीबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे.
भारतीय संघातील खेळाडूंची निवड करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) गुरुवारी बैठक झाली. त्यात निवड समितीचे पाटील यांच्यासह बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर उपस्थित होते. या वेळी पाटील यांना गौतम गंभीर याच्या नावाबाबत विचार झाला का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पाटील यांनी गंभीरच्या नावाचा विचार झाला नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे गंभीरचा भारतीय संघात समावेश होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याचा बऱ्याच कालावधीनंतर बांगलादेश दौऱ्यात संघात समावेश करण्यात आला. अमित मिश्राचीदेखील श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. त्यामुळे गंभीरचीदेखील संघात समावेशाची शक्यता होती. गेल्या काही काळापासून गंभीर आपल्या फॉर्मसाठी झगडत आहे. त्यासाठी गंभीरने आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज जस्टीन लँगर याच्याकडून फलंदाजीचे धडे घेतले आहेत.

Web Title: Gautam's selection committee is not 'serious'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.