गौतम मीडियावर झाला गंभीर
By Admin | Updated: December 30, 2015 03:04 IST2015-12-30T03:04:36+5:302015-12-30T03:04:36+5:30
सध्या टीम इंडियाबाहेर असलेला आणि सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या भारताचा आक्रमक सलामीवीर गौतम गंभीरने प्रसारमाध्यमांवर जोरदार टीका करताना, भारताचा मर्यादित षटकांचा

गौतम मीडियावर झाला गंभीर
नवी दिल्ली : सध्या टीम इंडियाबाहेर असलेला आणि सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या भारताचा आक्रमक सलामीवीर गौतम गंभीरने प्रसारमाध्यमांवर जोरदार टीका करताना, भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्याशी असलेल्या वादाचे खंडन केले.
काही दिवसांपूर्वीच विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिल्ली वि. झारखंड सामन्यात खेळ झाल्यानंतर गंभीरने धोनीशी हस्तांदोलन न केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले. या वृत्ताचे खंडन करताना गंभीरने ट्विटरवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये गंभीर व धोनी दोघेही हस्तांदोलन करताना दिसत आहेत. गंभीरने सांगितले, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या हस्तांदोलनापेक्षा अधिक आमच्या हस्तांदोलनाची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पाहायला मिळाली. कोणतेही वृत्त दाखवताना प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी.(वृत्तसंस्था)