गौतम गंभीर आणि विराट कोहलीला दंड

By Admin | Updated: May 4, 2016 17:09 IST2016-05-04T17:09:20+5:302016-05-04T17:09:20+5:30

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने थरारक विजय मिळवला. मात्र, दोन्ही संघाच्या कर्णधाराला दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे

Gautam Gambhir and Virat Kohli penalty | गौतम गंभीर आणि विराट कोहलीला दंड

गौतम गंभीर आणि विराट कोहलीला दंड

>ऑनलाइन लोकमत
बंगलोर, दि. ४ : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने थरारक विजय मिळवला. मात्र, दोन्ही संघाच्या कर्णधाराला दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. खुर्चीला लाथ मारल्याप्रकरणी गंभीरवर सामन्याच्या 15 टक्के रक्कमेचा दंड आकारण्यात आला आहे. तर धिम्या गतीने ओव्हर केल्याबद्दल कोहलीला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. 
कोलकाताच्या सूर्यकुमार यादवने विजयी चौकार लगावल्यानंतर डगआऊटमध्ये असलेल्या गंभीरने उत्साहाच्या भरात खुर्चीवर लाथ मारली. गंभीरवर सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यामध्ये मैदान, क्रिकेट साहित्य आणि जर्सीचा अपमान यांचा समावेश आहे. या २.१.८ या आर्टिकल अंतर्गत पंचांचा निर्णय हा अंतिम समजला जातो. गंभीरने त्याचं उल्लंघन केल्याने त्याला या कारवाईला सामोरं जावं लागलं.
बंगळुरुचा कर्णधार कोहलीला पराभवासोबतच दंडाच्या कारवाईलाही सामोरं जावं लागलं आहे. धिम्या गतीने ओव्हर केल्याबद्दल कोहलीला २४ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त संघातील प्रत्येक खेळाडूवर सहा लाख रुपये किंवा सामन्याच्या २५ टक्के रक्कमेची कारवाई करण्यात आली आहे, असं आयपीएलच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

Web Title: Gautam Gambhir and Virat Kohli penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.