कोर्टाच्या निकालावर गांगुली खूश

By Admin | Updated: July 26, 2015 01:51 IST2015-07-26T01:51:10+5:302015-07-26T01:51:10+5:30

दिल्ली कोर्टाने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून तिन्ही क्रिकेटपटूंची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केल्याने माजी कर्णधार सौरभ गांगलीने आनंद व्यक्त केला.

Ganguly is happy with the court's decision | कोर्टाच्या निकालावर गांगुली खूश

कोर्टाच्या निकालावर गांगुली खूश

कोलकाता : दिल्ली कोर्टाने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपातून तिन्ही क्रिकेटपटूंची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केल्याने माजी कर्णधार सौरभ गांगलीने आनंद व्यक्त केला. बीसीसीआयला या निर्णयामुळे कुठली अडचण राहणार नाही, असे सौरभने प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.
बंगाल क्रिकेट संघटनेच्या पुरस्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सौरभ म्हणाला, ‘न्यायालयाने जे योग्य वाटले तेच केले. हा चांगला निर्णय आहे.’ श्रीसंतच्या पुनरागमनाबद्दल गांगुली पुढे म्हणाला,‘ न्यायालयाने त्याला दोषमुक्त केले आहे. बीसीसीआयला अडचण नसेल. पण हा निर्णय बीसीसीआयला घ्यायचा आहे.

Web Title: Ganguly is happy with the court's decision