मांजरेकरच्या ड्रीम संघात गांगुलीला स्थान नाही

By Admin | Updated: September 25, 2016 20:45 IST2016-09-25T20:45:18+5:302016-09-25T20:45:18+5:30

टीम इंडियाच्या ५00 व्या कसोटीचा उत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना भारताचा ड्रीम संघ निवडण्याची संधी दिली.

Ganguly does not have a place in Manjrekar's dream team | मांजरेकरच्या ड्रीम संघात गांगुलीला स्थान नाही

मांजरेकरच्या ड्रीम संघात गांगुलीला स्थान नाही

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाच्या ५00 व्या कसोटीचा उत्सव साजरा करण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना भारताचा ड्रीम संघ निवडण्याची संधी दिली. त्यानंतर भारताचा माजी कसोटीपटू आणि आता समालोचक संजय मांजरेकर यानेदेखील आपल्या ड्रीम संघाची घोषणा केली आहे. मांजरेकरने त्याच्या ड्रीम संघात सलामीवीर फलंदाजाच्या रूपात लिटिल मास्टर सुनील गावस्कर आणि माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला पसंती दिली आहे. याशिवाय मांजरेकरने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी माजी कर्णधार राहुल द्रविड आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला संघात घेतले आहे.

पाचव्या आणि सहाव्या स्थानासाठी माजी दिग्गज खेळाडू गुंडप्पा विश्वनाथ आणि यष्टीरक्षक फलंदाज म्हणून टीम इंडियाचा विद्यमान वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला संघात स्थान देण्यात आले आहे. मांजरेकरने त्याच्या ड्रीम संघाच्या नेतृत्वाची जबाबदारीदेखील धोनीवर सोपवली आहे. १९८३ च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचा कर्णधार कपिलदेव याला अष्टपैलू म्हणून, तर माजी वेगवान गोलंदाज जहीर खान याला आठव्या स्थानासाठी संघात ठेवले आहे.

फिरकी गोलंदाजांच्या विभागातही मांजरेकरने त्याच्या संघात माजी दिग्गज गलेंदाज बिशनसिंह बेदी आणि इरापल्ली प्रसन्ना यांना स्थान दिले आहे. ११ वा खेळाडू म्हणून भागवत चंद्रशेखर यांनी संघात स्थान दिले आहे. मांजरेकरने गांगुलीशिवाय टीम इंडियाचे विद्यमान प्रशिक्षक अनिल कुंबळेंनादेखील स्थान दिलेले नाही.

Web Title: Ganguly does not have a place in Manjrekar's dream team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.